विद्युत प्रवाहाचा करंट लागुन शेतकऱ्याचा मृत्यू

29

🔺मौजा एकारा येथे आज सकाळी 7.30 वाजताची घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि.15जुलै):-ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी पंचायत समिती गणामध्ये मौजा एकारा येथे आज सकाळी ७.३० वाजता विद्युत प्रवाहाचा करंट लागुन शेतकऱ्याचा मृत्यु झाला. मृतकाचे नाव हरी गोविंदा मुरखे वय 48 आहे. आपल्या गावालगत असलेल्या शेतामधे भात पीकाला रासायनिक खत टाकण्या करिता गेला होता. कृषि पंपाला विज पूरवठा करण्यात येणारे दोन खांब मागिल 7 ते 8 दिवसापासून पडले होते. परंतू विज पूरवठा खंडित करण्यात आले नव्हता. अशा या विजवितरण कपंणीच्या निष्काळजी पणामूळे एका अपंग शेतकऱ्याला आपला जिव गमवावा लागला.

घरातील कर्ता व्यक्ति जाण्याने गावात हळहळ केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नि 1 मूलगा 1 मूलगी आहे. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळावर ब्रम्हपूरी पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर, एकारा ग्रामपंचायत सरपंच रमेश भैसारे, उपसरपंच हरिश्चंद्र गेडाम, पोलिस पाटील गुरुदास संग्रामे यांनी भेट दिली मात्र विज वितरण कंपनी चे कोणीहि कर्मचारी उपस्थित झाले नाही. पूढील तपास मेडंकी पोलिस करित आहे.