शिक्षणाचे मानसशास्त्र आणि सामाजिक मानसिकता

28

आज आपण संगणक युगात प्रवेश केला आहे. आपण विज्ञान शिकलो, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार आपण केला नाही. त्याचप्रमाणे समाज शिक्षित झाला. परंतु शिक्षणाचे मानसशास्त्र त्यांना समजले नाही. पुढील काळातील पिढीचा विचार न करता आपण आपला विचार करतो. आणि त्या भ्रामक मायाजालात स्वतःच स्वतःची पाठ थोपटून धन्य होत आहे. आज संपूर्ण समाजाची मानसिकता चुकीच्या दिशेने जात आहे. हे या शिक्षित समाजाच्या लक्षात कसे येत नाही, याचे आश्चर्य वाटते.

आपण आपल्या मुलाला अंगणवाडीपासुनच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवितो. भविष्यात त्याला इंग्रजीचे परिपूर्ण ज्ञान येईल. त्याला विज्ञान शाखा अवघड जाणार नाही. तो संगणक युगात चांगला यशस्वी होईल. आपल्याला भविष्याची चिंता राहणार नाही. इत्यादी अनेक स्वप्न उराशी बाळगून मध्यमवर्ग, नौकरदार वर्ग आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत दाखल करीत आहेत. याला कारण म्हणजे संपूर्ण समाजाची मानसिकता तशी बनली आहे.

मुळात महाराष्ट्रीयन माणुस अल्पसंतुष्ट आहे. आज आपणास व्यवसायाच्या शेकडो संधी खुणावत असताना आपण नौकरीच्या पाठीमागे धावतो आहे. आजपर्यंत डी. एड. केले की नौकरी मिळते अशी खात्री होती. परंतु तशी परिस्थिती आज नाही. डी. एड., बी. एड.करून हजारो लोक बेकार आहेत.

पुन्हा समाजात एक विचारसरणी आढळून येते की, इंग्रजी शिक्षण घेतले की तरच पुढे प्रगती होते. नाहीतर बेकारी शिवाय पर्याय नाही. मध्यमवर्ग व नौकर वर्गाने आपल्या मुलाला इंग्रजी शाळेमध्ये टाकण्यास सुरुवात केली. त्याची काय फलनिष्पती निघेल ते डोळ्यासमोर आहे. परंतु समाजाला ती दिसत नाही. कारण समाजाची मानसिकता तशीच बनली आहे. त्यांचा मुलगा इंग्रजी शाळेमध्ये शिकतो मग माझा सुद्धा शिकला पाहिजे.

सन २००१ पासुन इंग्रजी शाळा कमी, विद्यार्थी जास्त अशी परीस्थिती निर्माण झाली. त्यावर अवैज्ञानिक तोडगा काढण्यात आला तो म्हणजे वय अडीच ते पाच वर्षे, अबोध बालकांच्या मुलाखती व देणगी त्यावर ओरड झाली पण लोकांच्या काही पचनी पडले नाही. समाजातल्या हुशार व्यावसायिकांनी या संधीचा फायदा घेण्याचे ठरविले आणि इंग्रजी शाळेचे उदंड कारखाने निर्माण झाले.

शिक्षणाचे मानसशास्त्र काय सांगते ? मुलांची मातृभाषा, त्याची ज्ञानकक्षा हळूहळू विस्तारीत होते. त्याच्या कल्पना, विचार भावना, बुद्धी या सर्व गोष्टी तो मातृभाषेतुनच करतो. मुल स्वतःच आपल्या मनात ज्ञानाची काही संरचना करीत असते. त्या संरचनेत त्याला चूक वाटले तर ती संरचना स्वतःच दुरुस्त करून नवीन संरचना बनवितो. त्या-त्या वयात त्याला ती-ती संरचना बरोबर वाटते. परिसर, अनुभव, घडामोडी इत्यादी आंतरक्रियेमधून मुल स्वतःच आपल ज्ञान तयार करीत असतात.

या काळात बालकांची झपाटयाने प्रगती होण्यासाठी त्याला आजूबाजूची परीस्थिती १०० टक्के अनुकूल पाहिजे हे सुद्धा महत्वाचे आहे. परंतु इंग्रजी शाळेत संस्कृती व मराठी संस्कृती यांचा मेळ कसा बसणार ? मुल घरी पूर्णपणे मराठी भाषेत व्यवहार करतो आणि शाळेत इंग्रजी भाषा शिकतो. ही भाषेची आडकाठी त्या बालकाला शालेय जीवनात जाणवतो. तो परीक्षेला ८०, ९० टक्के व त्यापेक्षाही जास्त गुण घेतो हे मान्य आहे. परंतु त्यांची विचार कक्षा रुंदावली का ? त्याच्यामध्ये शिक्षणाची व्यापकता आली का ? मातृभाषेचे परिपूर्ण ज्ञान झाले का ? भाषेची विविध रूपे समजली का ? या प्रश्नाची उत्तरे आपणास समाधानकारक मिळूच शकत नाही.

इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. त्या भाषेशिवाय पर्याय नाही. ही बाब सत्य आहे. आज अमेरिका, ईंग्लंड यासारख्या देशात संगणक तज्ञ, डॉक्टर म्हणून भारतीय युवकांचे प्रमाण जास्त आहे. या युवकांचा अभ्यास केला असता असे दिसते की, त्यांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत झालेले होते. नंतर ते इंग्रजी शाळेकडे वळल्याचे दिसून येते. आपणही आपल्या पाल्याचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच केले पाहिजे.

श्री. पांडूरंग कृष्णाजी मेहरकुरे

जि. प. उ. प्रा. शाळा सोनेगाव (बे)

पं. स. चिमुर, जि. प. चंद्रपूर

मो. नं. ९४२१८७९९०३

✒️लेखक:-श्री. पांडूरंग कृष्णाजी मेहरकुरे(जि. प. उ. प्रा. शाळा सोनेगाव (बे), पं. स. चिमुर, जि. प. चंद्रपूर)मो.नं.९४२१८७९९०३