प्राथमिक आरोग्य केंद्र अर्हेर-नवरगावची जीर्ण इमारत बांधकामाच्या प्रतीक्षेत

26

🔹जीवित व वित्त हानी झाल्यास जबाबदार कोण? प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.17जुलै):- तालुक्यातील अर्हेर – नवरगाव
येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून पिंपळगाव (भो), भालेश्र्वर,
नांदगाव, नानोरी,दिघोरी, सोंद्री व इतर जवळपास असलेले खेडेगावातील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र अर्हेर – नवरगाव येथे उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात तसेच अत्यावश्यक पेशंट म्हणजेच गरोदर महिला यांच्या सारखे पेशंट अगोदर घेतल्या जात होते. त्यामुळे परिसरातील लोकांसाठी हे केंद्र सोईचे होते.परंतु आता जीर्ण इमारतीचे कारण सांगून अत्यावश्यक पेशंटला उपचार नाकारले जाते व त्यांना सरळ ब्रम्हपुरी येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यास सांगण्यात येत आहे.

अश्या वेळेस गरोदर महिला, तिचा बाळ व इतर अत्यावश्यक रुग्ण यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो . ही जीर्ण इमारत कोणत्याही हानीला कारणीभूत ठरू शकते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अर्हेर – नवरगाव येथील कर्मचारी सुद्धा आपले जीव मुठीत घालून कर्तव्य बजावत आहेत त्यांच्याही जीवाला धोका आहे, तरी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन जीर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र अर्हेर – नवरगाव इमारतीचे बांधकाम मार्गी लावून जीवितहानी, वित्तहानी टाळता येईल या दृष्टीने इमारतीचे बांधकाम मार्गी लावावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.