वृक्ष भेट व वृक्षारोपणाने प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांचा वाढदिवस रासेयोच्या स्वयंसेवकांनी केला साजरा

29

🔹लावलेल्या झाडांचे संगोपण करून संर्वधन करावे – प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(देि.17जुलै):- नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय,ब्रम्हपुरी येथिल होतकरू प्राचार्य डॉ एन एस कोकोडे सर, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेकांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी प्राचार्य डॉ एन एस कोकोडे यांना वडाचे रोपटे भेट देवून सर्व स्वयंसेवकांनी दिर्घाष्युषाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले. यात महाविद्यालयाच्या परिसरात 100 झाडे लावण्यात आले त्यात अशोक,निलगिरी सिताफळ व कडूलिंब अशा वेगवेगळ्या जातीचे रोपटे लावून प्राचार्यांचा वाढदिवस व्दिगुणीत केला.

यावेळी प्राचार्य कोकोडे म्हणाले की, लावलेल्या झाडांचे संगोपण करून संर्वधन करावे. तरच माझा वाढदिवस साजरा करण्याचे मला समाधान वाटेल. असे उपस्थित स्वयंसेकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर , डॉ तात्याजी गेडाम ,रासेयो कार्यक्रमधिकारी डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्यमाकर वानखडे, माजी स्वयंसेवक गोपाल करंबे,रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थी प्रतिनीधी कु. प्रियंका दिघोरे ,गजानन उराडे, अभिषेक चांदेकर , दिशा सेलोकर , हर्षदा लिचडे,प्राजक्ता बनकर ,प्रणाली ढोरे,अश्विनी उराडे,प्रगती सेलोकर , दुर्गा जुगनाके,वैष्णवी गुरूनुले,श्रीकांत ढोरे,भारती ठेगंरी ,स्वाती ढोरे,भुवनेश्वरी बनपुरकर, माजी स्वयंसेवक कविता घोरमोडे व उमेश फुलझेले यांनी अथक परिश्रम घेऊन वृक्षारोप व वाढदिवसाचा कार्यक्रम यशस्वीपणे केले.