हणेगाव येथील दहावीच्या सर्व शाळेचा शंभर टक्के निकाल

29

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

दगलूर(दि.17जुलै):- माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल काल १६ जुलै २०२१ रोजी लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे निकाल हे चांगले आल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पुढील आशा पल्लवीत होताना दिसत.गेल्या दीड ते दोन वर्षापासून संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना covid-19 ह्या जगाला हादरवून सोडणाऱ्या महामारी च्या आजारामुळे संपूर्ण जगाचा आर्थिक डोलाराच जमीनदोस्त झाला असून यामध्ये सर्व विभागाच्या प्रशासकीय शैक्षणिक असो किंवा शेतकरी असो कामगार असो कारखाने, बाजारपेठ असो सर्वच गेल्या दोन वर्षांपासून ठप्प असल्यामुळे शिक्षण-क्षेत्र यापासून वाचू शकले.

म्हणून शैक्षणिक विभागातल्या प्रत्येक परीक्षा राज्य व केंद्र शासनाच्या वतीने रद्द करण्यात आल्या व त्यास पर्याय म्हणून पुढचा विचार करून राज्य शासन व शिक्षण विभागाच्या माध्यमिक परीक्षा मंडळ यांनी निकषांवर निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे यावेळी हणेगाव येथील कै.इंदिराबाई देशमुख माध्यमिक शाळा, सावित्रीबाई फुले माध्यमिक मुलींची शाळा आणि जिल्हा परिषद हायस्कूल हणेगाव येथील शाळा या शाळेचा निकाल पूर्ण शंभर टक्के लागला असून सावित्रीबाई फुले शाळेतील सेमीच्या विद्यार्थीनी गायञी रवींद्र ज्यांते ही ९८.८०,आरती शिवकुमार खानापुरे ९७.८०,आकांक्षा बलभीम काडगे ९७.२०% अशी मार्क घेतली तर मराठी माध्यमांच्या नंदनी प्रकाश कळसे ९५.८०, शितल रवींद्रकुमार वंटगिरे ९३.७०, पवार स्नेहा मारुती ९२.१० असे मार्क घेऊन उत्तीर्ण झाले.

यावेळी या शाळेतील प्रथम श्रेणीमधे ११ विद्यार्थी तर विशेष प्राविण्य ३६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे यामुळे शाळेचे मुख्याध्यापक राणे सुरेखा पी. बी. माळगे, एम. मठपती, बडगे सर यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिले आहेत तर इंदिराबाई देशमुख माध्यमिक शाळा येथील सेमी च्या विद्यार्थीनींनी १ क्रांती देविदास मदने ९९-६०घेऊन केंद्रात ‌प्रथम तर संध्या संतोष धमनसुरे ९९-/ही केंद्रात दुसरा क्रमांक मिळविला आहे.

तर गायञी बालाजी सलगरे ही ९६-४०/घेतली असून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी वैभव गणेश दुधवाड‌ -९४-८०/ सपना नामदेव जाधव-९४-२०/ माऊली संतोष ठाकूर-९३-२०/ तर उमेहानी सय्यद टपेवाले -९१-८०/घेऊन उत्तीर्ण झाले व जिल्हा परिषद हा,चे बनीमटे संगमेश्वर सोमनाथ ८८-/ अतार आरिफ ७८-/टक्के घेऊन विद्यार्थ्यांनी आपले व शाळेचे नाव लौकीक केल्यामुळे शाळेचे संचालक प्राचार्य शंकरराव राठोड, प्राचार्य फुलसिग राठोड उपप्राचार्य सतीश पोकलवार राठोड,प्रा.नामदेव राठोड,प्रा.रमेश राठोड,महादेव राठोड खिंडे बी,टी, मुख्याध्यापक यांनी अभिनंदन केले आहेप