दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड़ विभागसाठी तीन विशेष रेल्वे

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.17जुलै):-सामान्य प्रवशाकरिता नांदेड़ विभाग दक्षिण मध्य रेल्वे तीन विशेष रेल्वे चालवित आहे या तीनही रेल्वे अनारक्षित प्रवासकरिता असतील.

1) गाड़ी सं 07777
नांदेड़ रोटेगांव डेमू दिनांक 19 जुलै पासून नांदेड़ रेल्वे स्थानक वरूण 19:25 वाजता निघुन रोटेगाव येथे सकाळी 03:00 वाजता पोहोचेल,
2) गाड़ी संख्या 07778 रोटेगांव नांदेड़ डेमू गाड़ी दिनांक 19 जुलै पासून रोटेगांव रेलवे स्थानकावरुन सकाळी 07:20 वाजता निघुन नांदेड़ रेल्वे स्थानकावर दुपारी 15:20 वाजता पोहोचेल,
3) गाड़ी संख्या 07776 परली ते आदिलाबाद डेमू विशेष – ही गाड़ी दिनांक 21 जुलै पासून परली रेलवे स्थानकावरुन दुपारी 15:45 वाजता निघुन आदिलाबाद रेलवे स्थानकवर रात्रि 23:55 वाजता पोहोचेल,
4) गाड़ी संख्या 07775 आदिलाबाद ते परली डेमू विशेष : ही गाडी दिनांक 22 जुलाई पासून आदिलाबाद रेलवे स्थानकावरुन सकाळी 03:30 वाजता निघून परली रेलवे स्थानकावर दुपारी 12:00 वाजता पोहोचेल.
5) गाड़ी संख्या 07774 अकोला ते पूर्णा विशेष डेमू गाड़ी : ही गाड़ी दिनांक 19 जुलै पासून अकोला येथून दुपारी 16:00 वाजता निघुन पूर्णा येथे रात्रि 21:10 वाजता पोहोचेल.
6) गाड़ी संख्या 07773 पूर्णा ते अकोला विशेष डेमू गाड़ी : ही गाड़ी दिनांक 19 जुलै पासून पूर्णा रेलवे स्थानकावरुण सकाळी 07:00 वाजता निघुन अकोला येथे दुपारी 12:10 पोहोचेल,
वरील सर्व गाड्या अनारक्षित प्रवासकरिता खुल्या असतील , प्रवसा करतांना राज्य आणि केंद्र सरकारच्या कोविड-19 नियमाचे पालन करने बंधन कारक असेल