माझा धम्म- माझी जबाबदारी

83

भारतातील लोक नेहमी इतर धर्मावर टीका करतात.पण माझ्या धर्मात चांगले काय आहे ते कधी जनतेला सांगत नाही.बुद्ध धम्माचा जन्म भारतात झाला.पण प्रचार प्रसार जगातील १८० देशात झाला.आज त्या सर्व देशात एकच सांगितल्या जाते माझा धम्म माझी जबाबदारी.त्याचे खास वैशिष्ट ते प्रत्येकाला समजावून सांगतात.मी भारतातील धम्म उपासक उपासिका पाहिल्या आणि थाईलंड,श्रीलंका मधील उपासक उपासिका पाहिल्या दोघांच्या आचरणात मोठा फरक जाणवला.विचार कितीही चांगले असू द्या आचरणात नसतील.त्याला काहीच अर्थ उरत नाही.संस्कारानुसार विचारांची मनाची जडणघडण होत असते.त्यातूनच आचरण दररोजच्या कामकाजातून दिसते.संस्कार विचार चांगले आहेत.मग आचरण का नाही.हा भारतातील सर्व उपासक उपसिकांना प्रश्न पडला पाहिजे.

हे मी थाईलंड,श्रीलंका देशाच्या विविध राज्यातील भव्य दिव्य बुद्ध विहारांना भेटू देऊन आल्यावर लिहतो.त्या देशात सर्वच नागरिक पंचशिलेचे पालन करतात.देशाचे संविधान व कायदा सुव्यवस्था यांचे काटेकोरपणे पालन करणारे नागरिक पंचशील जाणणारे आहेत.त्याचे एक डोळस उदाहरण म्हणजे एका शहरातून दुसऱ्या शहरात जातांना रोड खाली असतांना कोणती ही चारचाकी वाहन वेग मर्यादा वाढवून पुढच्या गाडीला मागे टाकत नाही.कारण कायद्याचे काटेकोरपणे पालन केल्या जाते.आमच्या देशात कायदे कडक आहेत.पण कोणीच त्याची भिती बाळगत नाही.पोलिसांना दंड किंवा लाच दिली तर सुटका होते.त्या देशात नियामचे उलंघन कोणी करत नाही.

कारण उलंघन करणाऱ्यांची संपूर्ण माहिती सर्व प्रचार,प्रसार मध्यमा द्वारे नागरिकांना दिली जाते.त्यामुळे त्यादेशाचे सर्व नागरिक त्या व्यक्ती व कुटुंबावर बहिष्कार टाकतात. यामुळेच त्या देशाचा गरीब श्रीमंत नागरिक देशाच्या कायदे नियमांचे काटेकोरपणे पालन करतात.हेच त्यांचे शिलाचे म्हणजेच पंचाशिलेचे पालन आहे.आपल्या देशात ना तर संविधानाची अंमलबजावणी होत, ना ही पंचाशिलेचे महत्व जाणल्या जात नाही.आज जगातील एकशे ऐंशी देशात बुद्धाच्या विचारांचा आदर्श ठेऊन घराघरातून पालन केले जाते. बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्व भारतीय बौद्धांनी धम्मजीवन जगून आदर्श समाज निर्माण करावा यासाठी कायम प्रबोधन जनजागृती करायचे.बाबासाहेबांच्या दृष्टितील आदर्श समाज निर्माण करावयाचा असेल तर सुरुवात ही आपल्याला आपल्या घरातुनचं करावी लागेल. याकरिता प्रत्येक बौद्ध कुटूंबाने आपल्या कुटूंबामध्ये धम्म आणण्यासाठी प्रयत्नशील राहुन आपले कुटुंब एक यशस्वी कुटूंब जे इतरांना आदर्श वाटेल असे कुटूंब तयार करावे. यासाठी घरातील सर्व सदस्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

याकरिता तथागत बुद्ध आणि बोधिसत्व बाबासाहेबांनी सांगितलेल्या प्रमाणे आठवड्यातून एक दिवस सातत्याने संपूर्ण कुटूंबासह धम्मश्रवण करणे अत्यावश्यक आहे.ही सवय संपूर्ण कुटूंबास पडल्यास यातुनचं आदर्श कुटूंब तयार होतील व या आदर्श कुटूंबामुळेचं आदर्श समाज निर्माण होईल,आदर्श समाजामुळे आदर्श देश तयार होतो,जो मी सुरवातीला लिहला आहे.तेच बोधिसत्व डॉ बाबासाहेबांना अपेक्षित होते.ते समजून घेण्यास आम्ही कमी पडलो इतर देशातील नागरिकांनी ते समजून घेतले आणि अमंलात आणले म्हणूनच ते देश मला बुद्धाच्या विचारांचे आचरणामुळे आदर्श वाटले.माणूस संकटकाळात माणसाचा कसा आधार होऊ शकतो, याच उत्तम उदा.तथागत बुद्धांनी दिलं आहे.

बुद्ध म्हणतात…जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तस तशी सूर्यफुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात म्हणजेच सुर्यप्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या शेतकऱ्यांना शहरातील शेतकऱ्यांच्या मुलामुलींना सर्वांना माहिती आहेच.पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते ?. तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील काय?. तर नाही. बिलकुल नाही,तर काय घडते त्यावेळी?. ही फुले खाली किंवा वरती नाही वळत तर ती वळतात समोरासमोर एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी.निसर्गाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात.आपण काय करतो?.

आपल्या देशातील सर्वच समाजाचे धर्माचे,धम्माचे लोक कायदे कानून नियम खिशात घेऊन व्यवहार करतात.शिल संपन्न माणसं आपल्याला दिसणार नाहीत. बुद्धाला मानणाऱ्या देशात ही शिल संपन्न माणसं सर्वच सार्वजनिक ठिकाणी नव्हे तर सुनसान ठिकाणी ही पंचशिलेच पालन करतांना दिसतील.आपल्या देशात निसर्गाच्या, कायद्याच्या आणि पंचशीलच्या नियमांचे पालन न करणारे बहुसंख्येने मिळतील.कारण त्यांना समाज काय म्हणेल यांची भीती वाटत नाही.त्या देशात समाज काय म्हणेल यांची भिती तर असतेच,पण आपण शिलाचे पालन केले नाही.यामुळे त्यांना रात्री शांत झोप लागत नाही.त्यामुळे ते बुद्ध विहारात जातात आणि मनाला शांत करतात.आपल्या देशातील लोक काय करतात.देशी,इंग्लिश मारतात.त्याने सर्वच विसरता येते असे म्हणतात.मन शांत होते कि शरीर ?.

निसर्गाच्या नियमांचे पालन केले नाही तर काय होते?.व्यसन लागते.मन व शरीर कायम अस्वस्थ राहते.कुटुंबात असंतोष वाढतो.सामाजिक,शारीरिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या अडचणी वाढतात. नियमाचे पालन न केल्यामुळे नि निघून जातो आणि यम उरतो.त्यामुळेच जीवनात अपघात होतात.कुठून सुरवात झाली,आणि आपण कुठे पोचलो. माणसाने ही निसर्गाची प्रक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे. समाजात अनेक लोक काळजीने,चिंतेने,परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल शैली माणसांनी उपयोगात आणली पाहिजे जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे,हीच तर बुद्धाच्या विचारांची ऊर्जा निर्माण करते.प्रत्येक माणसांनी सूर्यफुलासारखे संकटाच्या,निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना सहकार्य मदत करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे.विचार आचरणात आणले तर माणूस स्वता दुःख मुक्त होऊ शकतो आणि इतरांना ही दुख मुक्त करू शकतो.म्हणूनच विचारांचे संस्कार घराघरांतून झाले पाहिजे.प्रत्येकांनी हे म्हटले पाहिजे की माझा धम्म माझी जबाबदारी.

दुसऱ्या धर्मावर टीकाटिप्पणी करत बसल्या पेक्षा आपल्या धम्मात चांगले वैशिष्ट्य पूर्ण काय आहे ते सांगितले पाहिजे. आपल्या बौद्ध धम्मात माणसाला केंद्रबिंदू मानले आहे. भगवान बुद्धाने नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे. बुद्धांनी देव नाकारला आहे. भगवान बुद्ध म्हणतात तुमचे भले करणारे किंवा वाईट करणारी देव नावाची कोणती शक्ती नाही.त्यामुळे त्यांच्या भीतीने आरती, प्रार्थना आराधना किंवा शरीराला त्रास देणारे उपास तपास करू नका. बौद्ध धम्मात देव नसल्यामुळे आरती, प्रार्थना, आराधना नाही. कोणतेही कर्मकांड नाही. धम्मात वंदना आहे आणि वंदना ही निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा आहे. बुद्धाने देवाबरोबर स्वर्ग नाकारला आहे. स्वर्ग हे विज्ञानावर टिकत नाही किंवा त्याचे अस्तित्व आतापर्यंत कोणालाही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता आलेले नाही. बौद्ध धम्मात जातीयता, स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नाही. बौद्ध धम्मात आत्मा नाकारला आहे. आत्म्यावर विश्वास नाही हा अनात्मवाद आहे. धम्मात पुनर्जन्म नाही. भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला पुन्हा जन्म नाही, म्हणून या जन्मातच चांगले कर्म करा.बौद्ध धम्माने कर्मकांडाला नाकारले आहे.

बौद्ध धम्म सत्यावर आधारित असून व्यक्ति स्वातंत्र्याला पूर्ण वाव आहे. बौद्ध धम्मात मोक्षाची संकल्पना नाही भगवान बुद्धाने मोक्ष नाकारला. भगवान बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे. भगवान बुद्धांनी निर्वाण प्राप्तीचा मार्ग दाखवला आहे. बुद्धाचा विचार हा समस्त मानवाच्या सुखाचा मार्ग असल्याने त्यास अनुसरल्याने मानवाचे मंगल होणार आहे. म्हणूनच बुद्ध सांगतात स्वयं प्रकाशीत व्हा. बौद्ध धम्माने मोक्ष नाकारला, मोक्षप्राप्ती ऐवजी निब्बाण सांगितले आहे. बुद्धांचा धम्म माणसाला वैर भावना ठेवू नका, मैत्री भावनेने वागा असे सांगतो. बौद्ध धम्म मानवतावादी असल्यामुळे तो दैववाद नाकारतो.बौद्ध धम्म माणसाला भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान देतो. कल्पना, स्वर्ग, देव,आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष हे काल्पनिक आहे. धम्म शुद्ध कर्म करण्यास सांगतो.वाचेने,मनाने नेहमी शुद्ध कर्म करा. बौद्ध धर्म माणसाला आपले कर्तव्य आणि अकर्तव्य कोणते ते निश्चित समजावून सांगतो. माणसाला चारित्र्य आणि नैतिक मूल्य सांगतो, अचारसहिता ठरवून देतो. बौद्ध धम्म माणसाला जीवनात चांगले नियम, सद्गुण आणि चांगले विचार व चांगला दृष्टिकोन अवगत करण्यास सांगतो.
बौद्ध धम्म म्हणजे माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, समतेने वागावे, मैत्री भावनेने वागावे असे सांगतो.बुद्धांनी नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे.

मानवाचे जीवन सुखी व्हावे, मनुष्य कुशल कर्माकडे जावा आणि अकुशल कर्मापासून दुरावा हा हेतू भगवान बुद्धांचा होता.त्याचे पालन भारतातील लोक करीत नाही एक संघ नाही,इतर देशात संघाचे संघ आहेत,ते नियमितपणे एकत्र बसून चर्चा करतात.मानव हित आणि देशहित डोळ्यासमोर ठेऊन एकमेकांचे ऐकून घेतात आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करतात. शिक्षण,आरोग्य आणि रोजगार भव्य दिव्य बुद्ध विहाराच्या परिसरात उपलब्द करून दिला जातो.त्यामुळे सर्वांची समान प्रगती होते.प्रत्येकाची म्हणणे एकच असते.माझा धम्म माझी जबाबदारी.तो भारतीयांनी घेतला पाहिजे.

✒️धम्म उपासक सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९.भांडूप,मुंबई.