ब्रम्हपुरी शिवसेने तर्फे शिवसंपर्क अभियान उत्साहात सुरु

24

🔸शिवसेना घराघरात पोहचवणार : श्री नरेंद्र नरड

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18जुलै):-शिवसेना कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान मोहीम 12 जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली असून त्यातच चंद्रपुर शिवसेना जिल्हा प्रमुख मा.नितीनभाऊ मत्ते विधानसभा संपर्क प्रमुख संजयजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनात शिवसेना शहर प्रमुख श्री नरेंद्र नरड यांनी आज ब्रम्हपुरी शहरातील शाखा देलनवाडी वॉर्ड येथे शिवसैनिकांशी संवाद साधला व शहरात पक्षाची बांधणी तसेच वॉर्डातील प्रभागातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या नवीन सदस्य नोंदणीत जास्तीत जास्त लोक शिवसेनेशी कसे जुडवता येणार त्या साठी प्रयत्न करत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या योजना घरा घरात पोहचावा,प्रभागातील लोकांच्या नेहमी संपर्कात राहा, त्यांची कामे करा शिवसेना नेहमी लोकांच्या पाठीशी उभी आहे असे उपस्थित शिवसैनकांना मार्गदर्शन पर बोलतांना श्री नरेंद्र नरड यांनी सांगितले.

यावेळेस कार्यक्रमाला श्यामाभाऊ भाणारकर (जेष्ठ शिवसैनिक),दीपकभाऊ नवघरे,मारोतीजी पारधी (जेष्ठ शिवसैनिक) आशिष गाडलेवार(युवा सेना उपशहर प्रमुख) प्रमोद पिलारे(शाखा प्रमुख),सुरज देशमुख,अंकुश शिवदास,अक्षय काबळे,महेश वाकडे,वैभव देशमुख,सौरभ कुथे,अनिकेत नेवारे,अशोक पोइनवार आधी शिवसैनिक उपस्थित होते