अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यावर विशेष पथकाची कारवाई

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18जुलै):-दिनांक १७/०७/२१ रोजी पो.स्टे ब्रम्हपुरी येथील विशेष पथकास मिळालेल्या गुप्त खबरेवरून ग्राम कहाली येथे अवैध विनापरवाना दारू विकी करणारा आरोपी विलास आनंदराव दिघोरे वय ३७ वर्ष रा कहाली ता ब्रम्हपुरी जि चंद्रपूर याचे घरी झडती घेतली असता त्याचे घरी प्रत्येकी १० एम.एल च्या १०० नग असलेले ०१ बॉक्स याप्रमाणे एकण ०४ बॉक्स देशी दारू एकूण की .२०,००० रू चा मुद्देमाल मिळून आला.

नमूद आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला . सदरची कारवाई मा . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिलींद शिंदे , पोलीस निरीक्षक श्री रोशन यादव प्रभारी अधिकारी श्री अनिल कुमरे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री आशिष बोरकर यांचे नेतृत्वात हवालदार नरेश रामटेके नापोका मुकेश गजबे पो का प्रमोद सावसाकळे , प्रकाश चिकराम यांनी केली .