अमरावती विभागाच्या १५ साहित्यिकांनी दिला राजिनामा

28

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.18जुलै):-साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती शब्दशृंगार साहित्य मंचाचे संस्थापक मा. विशाल पाटील , वेरुळकर यांनी दि.१७/७/२०२१ रोजी अ.भा.म.सा.प.अमरावती विभागीय अध्यक्ष पदाचा दिला राजिनामा. या नंतर आचर्य होणारी घटना म्हणजे ,विदर्भ विभागाचे अध्यक्ष श्री आनंद कुमार शेंडे यांना विभागीय कार्यकारणी तसेच महिला विभाग कार्यकारणी मधील तब्बल १५ साहित्यिकांनी मागितला राजिनामा. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे , विदर्भ विभाग साहित्यिक क्षेत्रात अनेक समुह तयार त्या मध्ये कार्यरत राहणे शक्य नाही , या मध्ये एकचं पोष्ट किंवा एकचं , व तेचं ते व्यक्ती समाविष्ठ आहेत. त्या मुळे मोबाईल प्रॉब्लेम होतो. मोबाईलचा स्टोअर कमी असतो. असे श्री.विशाल पाटील यांनी सांगितले.

तसेच अमरावती विभाग कार्याध्यक्ष मयुरी कहाळे , कोषाध्याक्ष श्री दिलीप काळे , कार्यवाहक गोपाल मेहंगे , सरचिटनिस श्री बच्चुभाऊ गावंडे , उपाध्यक्ष अभय ठाकरे ,महिला आघाडी प्रमुख सौ. अश्वीनी घुले , महिला सहप्रमुख सौ.मिना फाटे , अमरावती विभाग सहप्रमुख वैष्णवी काळे , सल्लागार श्री निखिल पाटील गावंडे ,प्रसिद्धी प्रमुख यश इंगळे , संपर्क प्रमुख योगेश होनाळे , सदस्य श्री पुरूषोत्तम हिंगणकर यांनी सुद्धा राजिनामा दिला. तसेच विदर्भ महिला कार्यकारिणीच्या कोषाध्यक्ष सौ.शिवांगी राजेंद्र वेरुळकर नागपुर विदर्भ विभाग सदस्या निखिता डाखोरे ,कु .स्नेहा मोरे , आणि आकोला जिल्हा अध्यक्ष श्री दिनेश मोहरील यांनी देखिल राजिनामा दिला.

या सर्वानी राजिनामा दिल्यावर अ.भा.म.सा.प.विदर्भ विभागाचे श्री आनंद कुमार शेंडे यांनी सर्वांचा राजिनामा स्विकारावा अशी विनंती देखिल केली. पण् या मागील कोणते कारण असावे हे अध्यापही कळले नाही. काही जेष्ठ साहित्यिक मान्यवरांनी चर्चा करत असतांना श्री.विशाल पाटील , वेरुळकर यांना काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा “झाकली मुठ सव्वा लाखाची” असे चर्चेत बोलतांना दिसले!