पुरवठा अधिकारी व गेवराई तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करा- पत्रकार शाम अडागळे यांची न्यायालयात धाव

33
✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि. तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पत्रकार शाम अडागळे यांनी गेवराई न्यायालयात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी धाव घेतली आहे.

सविस्तर असे की दिनांक 26/03/2021 रोजी मा तहसीलदार सचिन खाडे यांनी काही माहिती अधिकार अपिलकर्ते यांच्या सूनवण्या ठेवल्या होत्त्या त्यामुळे पत्रकार शाम अडागळे याना दि.२४/०३/२०२१ रोजी तहसील कार्यालयातुन मा.आ. अ. २००५ कलम १९/१ अन्वये प्राप्त अपील प्रकरणात सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासाठी पत्र आले होते.
त्या अनुषंगाने शाम अडागळे हे सुनावणी साठी दि २६/०३/२०२१ रोजी ०४.१६ वाजता गेवराई तहसील कार्यालयात उपस्थित होते. व १० मिनिटांनी सुनावणीसाठी शाम अडागळे यांना कॅबिन बोलावले व तहसीलदार सचिन खाडे यांनी सुनावली ला सुरवात केली व मला विचारले तुला काय माहिती पाहिजे असे विचारून धातूर मातूर सुनावणी घेत ली व चुकीचा आदेश दिला त्यामुळे तो आदेश शाम अडागळे याना समाधान कारक वाटला नाही म्हणून तहसीलदार यांना बोलले की आपण चुकीचा आदेश करताय अशी विचारणा करताच गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांनी खुर्चीवरन उठून पत्रकार शाम अडागळे यांना शिवीगाळ करू लागले व अंगावर धावून येऊन धक्का बुक्की केली व तिथे उपस्थित पुरवठा अधिकारी शामसुंदर रामदासी यांनी अडागळे याना म्हटले की तू लय शहाणा झाला काय, लय माजलेत अशी भाषा वापरली व अपमानास्पद वागणूक दिली तसेंच सचिन खाडे यांनी पत्रकार शाम अडागळे व कॅबिन मध्ये त्यांचा सोबत असलेले राहूल चाळक व इतर एकजण याना शिपाईस बोलावून दरवाजा बंद करण्यास सांगून त्यांना कॅबिन मध्ये डांबून ठेवले .व कोरोना प्रतिबांत्मक कायद्याखाली तुम्हाला दाखवतो असे गेवराई तहसीलदार म्हणाले.
त्यामुळे शाम आडागळे यांनी सचिन खाडे यांच्या वर गेवराई पोलीस स्टेशन व उपविभागीयपोलीस अधिकारी कार्यालय गेवराई येते दि २६/०३/२०२१ रोजी तक्रार अर्ज दिला होता. तरी सदर तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारीची चौकशी ही एम बी जोगदंड मॅडम यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती.
परंतु शाम अडागळे यांनी दिलेल्या तक्रारीची पोलीस स्टेशन गेवराई यांनी कुठलीही दखल घेत नाहीत व चौकशी करीत नसल्याबाबत लेखी तक्रार दि ०३/०५/२०२१ रोजी केली होती.
शाम अडागळे यांनी दिलेल्या दि.२६/०३/२०२१ रोजी तक्रारीची चौकशी केली तर केलीच नाही उलटपक्षी त्यांनी त्यांच्या सोयीसाठी त्यांनी शाम अडागळे सोबत असलेले साक्षीदार राहुल चाळक व इतर एकजण यांच्यावर १८८,२६९,२७० प्रमाणे खोटा गुन्हा दाखल केला व तो अन्यायकारक असल्याचे शाम अडागळे यांनी म्हटले आहे.
तरी याप्रकरनात असलेले तापसी अधिकारी एम बी जोगदंड यांनी शाम अडागळे यांनी दिलेल्या तक्रारीची चुकीच्या पद्धतीने व त्यांच्या सोयी प्रमाणे चौकशी करून खोटा अहवाल तयार केला व श्याम अडागळे यांची तक्रार निकाली काढली आहे. असे पत्रकार शाम अडागळे यांचे म्हणणे आहे.
तसेच तहसीलदार सचिन खाडे व नायब तहसीलदार रामदासी यांच्या विरूद्ध सर्व पुरावे असतांना सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही . व दि २६/०३/२०२१ रोजी तक्रार देऊनही त्यांनी दोन ते तीन महिने विलंब लावला आहे. तसेच तपासी अधिकारी यांनी तहसीलदार सचिन खाडे व नायब तहसीलदार रामदासी यांच्याशी हातमिळवणी करून त्यांच्या सोयीप्रमाणे खोटा अहवाल तयार केला आहे त्यामुळे पत्रकार शाम अडागळे यांनी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गेवराई तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून गेवराई न्यायालयात धाव घेतली आहे.