राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शिरपूर तालुका आढावा बैठक सम्पन्न

24

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.19जुलै):- शिरपूर रेस्टहाउस येथे मा.श्री. किरणनाना शिंदे,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धुळे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर तालुका आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी श्री. डॉ. जितेंद्र ठाकूर, श्री. दिनेशदादा मोरे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष, श्री.आशिषकुमार अहिरे तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पक्षाचे संघटन, कामकाज, विविध राजकिय आणि सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत चर्चा करण्यात आली, यात शेतकरी, आदिवासी बांधवांच्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली.

तसेच ना.श्री. अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री, मा. राज्य यांच्या २२ जुलै, वाढदिवसाच्या औचित्य साधून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी माजी पं.स. सदस्य रामकृष्ण महाजन, जिल्हाउपाध्यक्ष निलेश गरूड, ओ.बी.सी सेल ता.अध्यक्ष विलास पाटील, आदिवासी आघाडी ता.अध्यक्ष कनिलाल पावरा, अल्पसंख्याक ता.अध्यक्ष वाजीदभाई शेख़, संस्कृतीक जिल्हाध्यक्ष प्रदीप गोपाळ, युवक विधानसभा श्रेत्र अध्यक्ष धिरज सोनवणे, युवक शहराध्यक्ष परेश शिंपी, विद्यार्थी शहराध्यक्ष भुपेश पाटील, युवक जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत पाटील, शिरीष पाटील, कांतीलाल पाटील डॉ.राहुल साळुंखे, विद्यार्थी ता.कार्याध्यक्ष अक्षय पवार, विद्यार्थी जि.सरचिटणीस गौरव महाजन, सौ. सत्यवती पावरा इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.