आम आदमी पक्षाने दिली मयुर राईकवार यांना युवा जिल्हाध्यक्ष पदाची जवाबदारी

22

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.19जुलै):-आम आदमी पार्टी ने आपचे संस्थापक सदस्य मयुर राईकवार यांना युवा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ति केली आहे.चंद्रपुर जिल्ह्यात संगठन निर्माण आणि पक्षात युवकांची संख्या बघता ही जवाबदारी मयुर राईकवार यांना दिली आहे. मयुर राईकवार हे पार्टी स्थापने अगोदर पासून अरविन्द केजरीवाल यांचा सोबत काम केलेले आहे. त्या मध्ये त्यांना केजरीवाल यांच्या कडून अन्ना आंदोलन मधील इंडिया अगेंस्ट करप्शन ची जिल्हा संयोजकाची जवाबदारी होती.

पक्ष स्थापने नंतर ते पार्टी चे संस्थापक सदस्य,चंद्रपुर जिल्ह्याचे पहिले जिल्हाध्यक्ष अश्या जवाबदारी त्यांना आजपर्यंत त्यानी पार पाडत अनेक प्रश्नांना वाचा फोडून अनेकांना न्याय मिळऊन दिला आहे. मयुर राईकवार यांनी म्हटले आहे की, व्यावसायिक कारणाने मध्यंतरी पक्षात सक्रिय नसलों तरी मागील विधानसभे पासून पक्षात सक्रिय आहो, आता पक्षा ने माझ्यावर युवा जिल्हाध्यक्ष ची दिलेली जवाबदारी ही आपण प्रामाणिकपणे पार पाडू व अरविन्द केजरीवाल यांचे आम आदमी पक्षाचे स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लावू असे मत मयुर राईकवार यानी बोलतांना व्यक्त केले.