गंगाखेड येथील कॉंग्रेस कार्यकर्ते यांनी बैलगाडी आणि सायकलवर प्रवास करून केला पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.19जुलै):-केंद्र सरकारने लादलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आज गंगाखेड कॉंग्रेसकडून जोरदार निषेध नोंदवण्यात आला. ही दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे स्थानिक नेते- कार्यकर्ते बैलगाडी आणि सायकलवरून तहसील कार्यालयात दाखल झाले. यावेळी दरवाढीच्या निषेथार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या आहेत. असे असतानाही केंद्र सरकार ईंधनावरील अधिभार कमी करायला तयार नाही. ही सर्वसामान्य नागरिकांची लूट असून सामान्यांच्या खिशावरील दरोडाच असल्याची खरमरीत टिका यावेळी करण्यात आली.

ही दरवाढ तात्काळ न रोखल्यास आगामी काळात कॉंग्रेसच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, माजी सभापती बाळकाका चौधरी, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, संयोजक – तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, न. प. सदस्य नितीन चौधरी, महिला प्रदेश सदस्या प्रा. शुभांगी शिसोदिया, युवक जिल्हाध्यक्ष प्रणित खजे, महिला तालुकाध्यक्षा प्रा. जयश्री पछाडे, अल्पसंख्यक सेलचे मराठवाडा ऊपाध्यक्ष मुशरफ खान, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष रोहिदास घोबाळे, युवक चे सरचिटणीस, माजी सरपंच सिद्धार्थ भालेराव, गोपीनाथराव भोसले, सुशांत चौधरी, साहेबराव चौधरी, आदित्य चौधरी, युवक शहराध्यक्ष नागेश डमरे, भांबारवाडीचे सरपंच गोविंदराव भांबरे, कांताबाई कुरूडे, रंजनाबाई भालेराव, गोविंद शिंदे, नरेंद्र मस्के, रमेश मुंडे, नामदेव चव्हाण, अभिजीत चौधरी, प्रथम यादव आदिंसह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.