मुखवट्यामागील चेहरे

26

मानवीय चेहरा हा एका व्यक्तीचा चेहरा दिसत असला तरी त्या चेहऱ्यांच्या मागे अनेक चेहरे लपले असतात.काही चेहरे सत्यवादी तर काही चेहरे असत्यवादी असतात.चेहऱ्याची भाषा प्रत्येकालाच वाचता येत नाही.फसव्या चेहऱ्यांची भाषा लवकर समजत नाही.मुखवट्यामागील चेहरे आपल्या अवतीभवती सातत्याने फिरत असतात.आजच्या वर्तमानीतील हे चेहरे राजकारण,धर्मकारण ,समाजकारण,सांस्कृतिक,शैक्षणिक अशा अनेक विभागात वावरत असतात.हे चहरे असत्य लपविण्यासाठी मुखवटे घालतात.आपले असत्यपण दिसू नये म्हणून ते ढोंगीपणाचा आव आणतात.या फसव्या चेहऱ्यामुळे सामान्य माणसाचे जीवन उध्दवस्त होते.धर्म ,जात,पंथ,संस्कृती,
सत्संग ,अशा मोहजालात ठेवून आपले इप्सित साध्य करतात.अशा बनावट चेहऱ्यांच्या मुखवट्यापासून देशाचे रक्षण करावे.

चेहरा हा मानवाचा आरसा असतो.त्यांच्या आंतरिक मनोभावनेचे प्रतिबिंबि चेहऱ्यावर पाहायला मिळते.पण आजच्या आभासी महाजालात चेहऱ्यांची सत्यता ओळखता येत नाही.राजकारणी लोकांचे चेहरे तर नक्कीच फसवणारी असतात.सत्तेच्या बळावर ते अतोनात खोटे बोलतात.स्वतःची उदारवादी प्रतिमा तयार करतात.कोरोना काळात उत्तर प्रदेश सरकारची दुर्दशा साऱ्या देशानी पाहल्यावर प्रधानमंत्री योगी सरकारची पाठ थोपठतात.योगी सरकारने अभुतपूर्व काम केले असे प्रशिस्तप्रत्र देतात.यावरून राजकारणी नेते कसे आपले मुखवट्यामागील चेहरे बदलत असतात हे जिंवत उदाहरण आहे.धर्मकारणातील चेहरे स्वतःचा धर्म श्रेष्ठत्व आहे याचे तुणतुणे वाजवतात व आपल्याच बांधवाच्या हक्काविरूध्द लढतात.आरक्षण वाद -प्रतिवाद-संवाद यामधील चेहरे कसे फसवे असतात याचे वास्तव वर्तमानात घडणाऱ्या घटनावरून आपण पाहिले आहे.देश हा सैंवधानिक कायद्यान्वये चालणार असे न्यायालय सांगत असले तरी मुर्खाच्या नंदनवनात राहणारे राजकिय व धर्मपिसाट हा देश आमच्या मर्जीने चालवणार असा वितंडवाद तयार करतात.राजकारणातील चेहरे जसे फसवणारे असतात तसेच चेहरे समाजकारण व साहित्यकारक यांचे सुध्दा दिसून येतात.समाजकारण करणारे काही महाभागाचे चारित्र्य व बोल यामध्ये नेहमी संदिग्धता दिसून येते.साहित्यातील विविध कृतीतून काही लेखक मोठमोठे विचार मांडत असले तरी त्याच्या वास्तविक जीवनात ते तसे वागत नाही हे जळजळीत वास्तव आहे.

कोरोना काळाच्या संक्रमणात असे चित्र सातत्याने पाहता आले.नुकताच मी बर्डीवरून निघालो होतो.मेट्रोचे सुशोभिकरण मनाला आनंद देत होते.त्याच मेट्रोखाली भटक्यांच्या कुटूंबाने आसरा घेतला होता. त्याचे चेहरे मलूल दिसत होती.मानवीय चेहरे काळवढलेले दिसत होते.त्याच्या मुलांचे भविष्य मातीमोल होत होते.नागपूरच्या गंगनचुंबी इमारती आकाशा सोबत स्पर्धा करत होत्या .मोठे मोठे रोड,सिमेंटचे रोड,मेट्रो रेल,उड्डाणपूल,असे सारे बनत असले तरी या बदलत्या नागपूरातील चेहऱ्यावर एक काळा चेहरा लपलेला आहे.या विकासाने अनेक लोकांचे उदरनिर्वाह करण्याचे ठिकाण उद्धवस्त केले आहे.बदलत चाललेल्या नागपूरातील संवेदना मात्र हरवत चालली आहे.

काही चेहरे अत्यंत विकृतीयुक्त असतात सातत्याने ते रंग बदलवत असतात .कपड्याचे रंग बदले तसे नोटाचे रंग बदलले यावरून आपण समजून घेतले पाहिजे. टकलू गँगचे चेहरे सातत्याने बदलत आहेत. तडिपार झालेले चेहरे स्वतःचा मुखवटा बदलवण्याच्या फिकर मध्ये आहे.मानवी सभ्यतेची सारी पायमल्ली होत आहे.हे चेहरे भक्तगणांना एवढे मनमोहत करून ठेवतात की आपण गुलाम होत असतांना ते आपली गुलामी समजू शकत नाही.

आजच्या भयावह व खडतर प्रवाहात अनेक चेहरे भारतीय लोकांचे शोषण करत आहेत.प्रत्येक क्षेत्रात असे चेहरे राजरोशपणे फिरत आहेत.धर्मकारणातील व राजकारणातील काही चेहऱ्यांचा नकाब उतरला आहे .ते चेहरे जेलच्या अंदर प्रवचण स्वतःलाच देत आहेत.देशातील लोकांना इव्हेंटमध्ये मशगुल ठेवण्यासाठी ताली बजावो,दिवे लगावो,पुष्पवृष्टी करो ,लसोत्सव करो असे कृती करण्यात आल्या पण कोरोना काही आटोक्यात आला नाही.विज्ञानाला धाब्यावर बसावल्याने आपण दुसरी लाट थोपवण्यास असमर्थ ठरलो.नुकत्याच पेगासस कांड मध्ये अनेक लोकांचे फोन जासूस करण्यात आले .सरकार आपल्या निवडणूक यशासाठी साऱ्या लोकशाही मर्यादाचे उल्लंगण करत आहे.इलेक्टोरल वेपन म्हणून पेगासस चिपचा वापर सरकार करत तर नाही ना हा प्रश्न अनेकाना पडला आहे.
आतातरी सर्व भारतीयांनी मुखवट्यामागील चेहऱ्यांचे नकाब काढण्यासाठी जन आंदोलन करावे.आपण आपला संघर्ष सोडता कामा नये .जे जे उत्तम ते ते सर्व करावे पण चेहऱ्यांमागच्या फसव्या चेहऱ्यावर विश्वास ठेवू नये.हे चेहरे भारतीय लोकशाहीला उध्दवस्त करण्यासाठी टपून बसले आहेत.अशा मुखवट्यामागील चेहऱ्यांचे वास्तव लक्षात घेऊन त्यांचे बुरखे टराटर फाडले पाहिजे.देशाला व देशातील लोकांना वाचवण्याचा हाच खरा मार्ग आहे दुसरा मला माहित नाही.तूर्ताश थांबतो.

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००