पूर्व माध्यमिक शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले संताप निवेदन

20

✒️वर्धा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वर्धा(दि.21जुलै):-माध्यमिक विद्यालयातील पूर्व माध्यमिक शिक्षकांवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मंगेश घोगरे यांना संताप निवेदन दिले‌.विनियमन अधिनियम 1977 नियमावली 1981 नुसार वर्ग 5 ते 7 वर्ग 5 ते 12 माध्यमिक विद्यालयाचे संचालन महाराष्ट्रात सुरू आहे .पूर्व माध्यमिकवर नियुक्त डी.एड. (दोन वर्षे पाठ्यक्रम), कला व क्रीडा शिक्षक सातत्याने दुर्लक्षित राहिला असून या शिक्षकांना सेवाज्येष्ठता व पदोन्नतीपासून सातत्याने चाळीस वर्षापासून अन्याय सहन करावा लागत आहे. याविषयी संताप व्यक्त करून मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी डॉ. मंगेश घोगरे यांना देऊन चर्चा करण्यात आली.

अधिसूचना 8 जून 2020 नुसार पदवीधर डी.एड .(दोन वर्षे पाठ्यक्रम)शिक्षकांचा पदवीप्राप्त तारखेला “क” प्रवर्गात समावेश करून सेवाजेष्ठता बनवाव्यात. पाचव्या वर्गावरील शिक्षकांना वर्ग सहा ते आठ वर व सहा ते आठ वरील शिक्षकांना वर्ग नऊ ते दहा वर त्यांच्या व्यावसायिक व शैक्षणिक अर्हता लक्षात घेऊन उन्नत करावे व नियमावली 1981 चे पालन करावे.
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिक्षकांची 12 वर्षे व 24 वर्षे सेवा पूर्ण होताच विनाअट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी . 2005 नंतर नियुक्त शिक्षकांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी . पूर्व माध्यमिकवर प्रशिक्षणाची अट असतांना देखील अप्रशिक्षित शिक्षकांना प्रवर्ग “क” मध्ये दाखवून पदवीधर डी. एड. (दोन वर्षे पाठ्यक्रम) शिक्षकांवर सेवाज्येष्ठता व पदोन्नती मध्ये अन्याय केल्या गेला .बी.ए./ बी.कॉम ./बी.एस्सी .बी.एड .ही अर्हता पूर्व माध्यमिकची नसतांना देखील यांचा समावेश “क” प्रवर्गामध्ये करून पदवीधर शिक्षकांवर अन्याय केल्या गेला . तेव्हा हे नियमबाह्यता लक्षात घेऊन माध्यमिक विद्यालयातील सेवाजेष्ठता नियमानुसार अद्ययावत करून पदवीधर डी.एड.(दोन वर्षे पाठ्यक्रम) प्रशिक्षित शिक्षकांना पदोन्नती देण्यात याव्यात.

शिक्षणाधिकारी माध्यमिक ,वर्धा यांनी दिलेल्या सेवाजेष्ठता निर्णयाची अंमलबजावणी संस्थांवर बंधनकारक करावी. वर्ग सहा ते आठ वरील सर्व शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. इत्यादी मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना देण्यात आले .निवेदन देताना राज्याध्यक्ष पद्मा तायडे उपाध्यक्ष राजेंद्र मसराम जिल्हाध्यक्ष रेखा जुगनाके , विजय जुगनाके सचिव अनिल आमझरे सहसचिव किरण पांडे आदींची उपस्थिती होती.