उघडेवाडीजुनी ते करलेवाडी १ किलोमीटर रस्तांची दुरावस्था

29

🔹गांव विकासापासुन कोसो दुर… शासनाने लक्ष देण्याची मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21जुलै):-तालुक्यातील ग्रामीण भागातील दामपुरी ग्रामपंचायत अंतर्गत उघडेवाडी जुनी येथील रस्त्याची दुरावस्था झाली असून उघडेवाडी जुनी ते करलेवाडी या रस्त्यावर केलेले अतिक्रमण तसेच त्यामुळे गांव कऱ्याना दळणवळणाची साधने, रस्तांची दुरावस्था यामुळे नागरिकांना प्रवास करताना नाहकत्रास सहन करावा लागत आहे.उघडेवाडी जुनी ते करलेवाडी या रस्त्यावर १ किलोमीटर अंतरामध्ये दोन नद्यां व नंदीवर पुलाची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात गंभीर आजार उद्भवल्यास किंवा इतर आजारी रुग्णांना नदीपात्रातुन घेवून जाण्यास पुलाची व्यवस्था नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत तसेच गावातील नागरिक मोलमजुरीला बाहेर गांवी गेल्यानंतर, पावसाळ्यात पुर आल्यानंतर नदीच्या पात्रात पुलाची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना स्वतःचे जीवन धोक्यात घालून गावात जावे लागते.

रात्री बेरात्री एकदास संप्देश झाल्यानंतर दवाखान्यात नेण्यासाठी नदीपात्रातुन पुलाची व्यवस्था नसल्याने पेशंटचे जीवनाला धोका निर्माण निर्माण होऊन पेशंट जागीच मृत्यू होऊ शकतो असे प्रसंग गावकऱ्यांनीअनुभले आहेत.शेतकरी बांधवांना शेतीसाठी लागणारे बिबियाणे व शेतीचे माल वाहतूक व्यवस्था नसल्याने अनेक वर्षांपासून समस्या निर्माण होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

त्यामुळे नागरिकांचे जीवन त्या असा अनेक दुर्देवी घटनाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने व प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधी यांनी गावकऱ्यांचे समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यात यावा.शासनाने योग्य लक्ष देऊन सव् प्रश्न सोडवावेत अन्यथा गावकर्‍यांची समस्या सुट नसेल तर परभणी जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येईल. समाज सेवक तुकाराम हाके यांनी आंदोलने करण्यात येईल असा इशारा