मांडवा येथे शिवसंपर्क अभियानाअंतर्गत बैठक संपन्न

28

✒️बाळासाहेब ढोले(पूसद प्रतिनिधी)

पुसद(दि.21जुलै):-शिवसेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हाप्रमुख मा.राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये शिवसंपर्क अभियान १२ जुलै पासून ते २४ जुलै पर्यंत राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने पुसद तालुक्यातील मांडवा येथे शिवसंपर्क अभियानाअंतर्गत २० जुलै रोजी स्थानीय श्री समर्थ नागोजी महाराज परिसरातील सभामंडप येथे शिवसेना पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड हे उपस्थित होते .तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा उपप्रमुख राजूभाऊ साकला, विधानसभा सहसंपर्क प्रमुख ॲड.उमाकांत पापीनवार, तालुका प्रमुख दिपक काळे, उपतालुका प्रमुख संजय जोगदंड ,माजी तालुका प्रमुख रवि पांडे, माजी पं स.उपसभापती गणेश पागिरे,उपजिल्हा युवासेना अधिकारी,हर्षद साकला तालुका अधिकारी युवासेना,वैभव सुने पुसद अधिकारी युवासेना, परेश देशमुख,संजय बयास, दिपक उभाळकर , निखिल दसरते ईत्यादी उपस्थित होते.

शिवसंपर्क अभियानात गावातील समस्या जाणून घेण्यात आल्या, स्मशानभूमी करिता संरक्षक भिंत , गावातील विविध रस्ते व नाल्या करणे, ३ पांदण रस्ते, पक्ष संघटन करणे, गावागावात शाखा स्थापन करणे, फलक लावणे,अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी अश्विनी चव्हाण, बोरी विभाग प्रमुख तथा ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे, मांडवा उपशाखा प्रमुख रामदास वानखेडे,उपसरपंच विजय राठोड, अरुण मंदाडे, नागु टेकाळे, रमेश ढोले, पंडित पुलाते, ईश्वर घुक्से, प्रकाश ढोले, गौवर्धन ईखार, विष्णू ईखार, संतोष राठोड, संतोष तांबसकर, राजु आबाळे, सुनील घुक्से, सुनील पुलाते, रंजित आडे, ईत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी तसेच युवासेनेचे पदाधिकारी आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश पुलाते,यांनी तर आभार अश्विनी चव्हाण ह्यानी मानले.