बळसाणे येथे शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान संपन्न

76

🔹गावातील शाखाप्रमुख यांनी जनतेच्या समस्या सोडवाव्यात!- हिलाल माळी…

✒️प्रतिनिधी विशेष(जयदिप लौखे-मराठे)

धुळे(दि.22जुलै):- शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या आदेशान्वये शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते खासदार संजय राऊत शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर व संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेतर्फे संपर्क अभियान राबविले जात आहे धुळे जिल्ह्यात शिवसंपर्क मोहिमेचे आयोजन सुरू असून प्रत्येक पंचायत समिती गणांच्या बैठकी घेण्यात आल्या.

या अभियानात शिवसेना उपतालुका प्रमुख उपसरपंच महावीर जैन यांनी वरीष्ठापुढे समस्या माङंताना सांगितले की, बळसाणे गटात तरूणांना व्यायामशाळेची फार आवश्यकता आहे त्यासाठी सरकार कडून सदर कामाचा पाठपुरावा करण्याचे काम हाती घेतले आहे तसेच आगारपाडा गावात आजपर्यंत बस आली नाही म्हणून ही बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल व बळसाणे गाव तीर्थक्षेत्र असल्यामुळे या गावाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. 

बळसाणे आगरवाडा लोणखेडी कढरे सतमाने,फोफारे,घाणेगाव,नागपूर,छावडी,आमोदे,उभंड,भडगाव,आदी गावातील उपस्थित पदाधिकारी शिवसैनिकांना शिवसंपर्क मोहीम यशस्वी करण्याच्या बैठकीमध्ये शिवसेना पक्षसंघटन करणे,गावागावात शिवसेना शाखा स्थापन करणे,नवीन मतदारांची नोंदणी करणे,आधारकार्ड नोंदणी करणे,रिक्त असलेले विभागप्रमुख,शाखाप्रमुखांची पदे भरणे,गावागावात शिवसेना शाखेचे फलक अनावरण करुन शाखा सुरु करणे ,तसेच आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे,तसेच महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहिती तसेच या योजनांपासून वंचित असलेल्यांना लाभ मिळवून द्यावा व कोरोना सारख्या आजारापासून सावध राहण्यासाठी घराघरात जाऊन लसीकरण करून घेणे इत्यादी विविध प्रमुख विषयावर शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी मार्गदर्शन केले.

ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे  साक्री तालुकाप्रमुख पंकज मराठे, यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा संघटक मंगेश पवार उपजिल्हाप्रमुख भूपेश शहा, महिला जिल्हा संघटिका संगीता जोशी,गणेश परदेशी,महेश खैरनार, सुदर्शन पाटील,डॉ.यशवंत पाटील ,वासुदेव बोरसे,गोकुळ महाजन,वसंत मासूळे ,चुडामन शेलार,हिम्मत गिरासे,भटू खांडेकर,किशोर महाले, दीपक माळी,पावबा माळचे,बापू माळचे,आदी उपस्थित होते. तसेच बळसाने गणातील शिवसेना कार्यकर्त्यां सह ग्रामास्थांची उपस्थिती होती या शिवसंपर्क अभियानाचे आयोजन शिवसेना उपतालुकाप्रमुख महावीर जैन यांनी केले होते.