पँथर किरणजी बनसोडे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्त कोरोना योद्धा पुरस्कार व सन्मान चिन्हं प्रदान करण्यात आले

21

✒️साचिन सरतापे(म्हसवड प्रतिनिधी)

माण(दि.२२जुलै):-पॅंथर मा.किरण विठ्ठल बनसोडे(सातारा जिल्हा कार्याध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त भालवडी ता.माण येथील आयोजित कार्यक्रमात माण तालुका अध्यक्ष पॅंथर मा.प्रमोद लोखंडे, सातारा जिल्हा संघटक पॅंथर मा.अनिरूध्द खरात, माण तालुका उपाध्यक्ष पॅंथर मा.दिपक बनसोडे, मा.सरपंच स्वप्निल सावंत युवा कार्यकर्ते पॅंथर मा.देवा बनसोडे, म्हसवड शहर उपाध्यक्ष पॅंथर मा.विक्रम लोखंडे व सर्व सातारा जिल्हा, माण तालुका कार्यकर्ते यांच्या नियोजनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष पॅंथर मा.बाळासाहेब पडवळ साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पॅंथर मा.डाॅ.घनश्याम भोसले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पॅंथर मा.महेश गायकवाड, मा.विश्वास मोरे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, सातारा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण काकडे, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख पॅंथर मा.विराज भोसले व महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी कोरोना काळात ज्या ज्या कोरोना योध्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी असामान्य कार्य केले त्यांना “कोरोनायोध्दा पुरस्कार” व “सन्मान चिन्ह” देउन सन्मानित केले.

त्यावेळी पॅंथर मा.विक्रम चव्हाण यांना सातारा जिल्हा युवक सहअध्यक्ष, पॅंथर मा.गणेश देवकुळे यांना माण तालुका सल्लागार, पॅंथर महादेव अवघडे यांना माण तालुका कार्याध्यक्ष, पॅंथर मा.स्वप्निल भोकरे यांना माण तालुका युवक अध्यक्ष, पॅंथर मा.सुनील माने यांना माण तालुका उपसंघटक पदी नियुक्ती करण्यात आले. दलीत पॅंथर संघटनेचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रासह देशात उसळला आहे त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेवर जिथे जिथे अण्याय होईल तिथे तिथे दलीत पॅंथर संघटना पोहचेल व अन्याय मोडून काढून जनतेला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असे प्रतिपादन दलीत पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.डाॅ.घनश्याम भोसले यांनी केले तर आम्ही एकटे आलो नसून पॅंथर पद्मश्री मा.नामदेव ढसाळ साहेबांचा वारसा व समाजकार्याचा विचार सोबत घेऊन आलो आहोत.

त्यामुळे जिथे अन्याय होईल तिथे दलित पॅंथर संघटना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य दलीत पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाळासाहेब पडवळ यांनी केले. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मा.कविता बोंडे (प्रदेश अध्यक्षा महिला), मा.अंकुश आवाडे (पुणे जिल्हा अध्यक्ष), मा.आकाश डबकरे ( पुणे जिल्हा उपाध्यक्ष ),मा.अमित बगाडे (संघटक पुणे जिल्हा),मा.सुनिता गायकवाड (पुणे जिल्हा अध्यक्षा महिला)मा.डाॅ.रूपाली भोसले, मा.गौरव अहिवळे (बारामती तालुका अध्यक्ष), मा.शांतनू साळवे (बारामती तालुका कार्याध्यक्ष),मा.शिवदास जगताप (सरचिटणीस बारामती तालुका),मा.शुभम गायकवाड (बारामती शहर अध्यक्ष), सुरेश कांबळे( सामाजिक कार्यकर्ते) तसेच सातारा जिल्हा आणि माण तालुका कार्यकर्ते व जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व जनसमुदाय यांनी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पॅंथर मा.किरण बनसोडे यांना वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या भरघोस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची धुरा युवा कार्यकर्ते प्रदिप तुपे यांनी सांभाळली तसेच आभार प्रदर्शन सातारा जिल्हा संघटक पॅंथर मा.अनिरूध्द खरात खुटबावचे मा.सरपंच स्वप्निल सावंत यांनी केले.