मुसळधार पावसामुळे वाडीपीर मध्ये ओढा पात्राबाहेर

27

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.22जुलै):-सलग दोन-तीन दिवस जोरदार मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील वाडीपीर येथील ओढ्याचे पात्र ओसंडून पात्राबाहेर पडले आहे. हे पाणी वाडीपीर चे ग्रामदैवत पीर देवस्थानच्या आसपास असणाऱ्या वस्तीमध्ये शिरले आहे. राठोड फौंडेशनचे सुरेश राठोड(पत्रकार) यांच्या घरापासून ग्रामदेवता च्या हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या उंबऱ्या पर्यंत पाण्याचा ओघ ओसंडून वाहत आहे.

 शेतातील बांध फुटलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आज गुरुवार असल्यामुळे गावातील सर्व नागरिक ग्रामदेवता च्या दर्शनाला जाताना तारेवरची कसरत करत जाताना दिसत होते तर काही नागरिक पाण्याचा लोड पाहून तसेच मागे फिरले. असाच पाऊस सुरू राहिला तर वाडीपिर मधल्या नागरिकांना अत्यावश्यक सेवेची गरज लागेल.

अजून कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी व चौकशी केलेली नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी ही अशी स्थिती होती त्यावेळी शासकीय अधिकाऱ्यानी कानाडोळा करत काही लोकांना शासकीय मदत देत काही लोकांना आजही अधांतरीत ठेवले आहे. यावेळी तर मदतीचा हात शासनाकडून मिळावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.