उमरखेड येथे नवीन पशुवैद्यकीय चिकित्सालयासाठी दोन कोटी

64

✒️अमोल उत्तम जोगदंडे(उमरखेड प्रतिनिधी)मो:-8806583158

उमरखेड(दि 22जुलै):- येथे सुसज्ज तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाकरिता मान्यता देण्यात आली आहे. यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तालुक्यातील जनावरांना वेळेत पशुवैद्यकीय सेवा मिळण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बाधंकाम सभापतीच्या पुढाकारातुन लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाला मान्यता देण्यात आली. लवकरच भूमिपूजन होणार आहे, आशी माहिती जिल्हा परिषदेचे बाधंकाम सभापती राम देवसरकर यांनी दिली. शेतकरी बैल,गाय,शेळी पालन व्यवसाय करून जोडधंद्याकडे वळत आहे.मात्र नैसर्गिक आपदा आणि विविध संसर्गामुळे अनेक गुराढोरांचा मृत्यु होतो.

त्यांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडतात.आता शहरात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे असलेल्या जागेत दोन एकरच्या परिसरात भव्य आणि सुसज्ज सुविधायुक्त तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय साकारण्यात येत आहे. या नवीन चिकित्सालयासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, उपाध्यक्ष क्रांती कामारकर यांच्या सहकार्यामुळे निधी मिळाल्याचे राम देवसरकर यांनी सांगितले.