वेल्हाणे येथील माध्यमिक विद्यालय शाळेत गुरुपौर्णिमा निमित्त करण्यात आला न्यु शिवरुद्राक्ष ग्रुप तर्फे शिक्षकांचा सत्‍कार

23

✒️प्रतिनिधी(जयदिप लौखे-मराठे,वेल्हाणे धुळे)

वेल्हाणे(दि.23जुलै):- धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील माध्यमिक विद्यालय वेल्हाणे या शाळेत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील न्यु शिवरुद्राक्ष ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माध्यमिक विद्यालयाच्या प्रथम महिला मुख्याध्यापिका गुरुवर्य श्रीमती. एस.ए. पाटील(मॅडम), गुरुवर्य श्री.एम.के. मराठे, गुरुवर्य श्री.एस.बी. सोनवणे, गुरुवर्य श्री.एम.डी. अहिरे, गुरुवर्य डि.डि. ठाकरे, संजय पाटील, गौरव सोनवणे, के.आर. ठाकरे, राहुल पाटील यांचा भगवी पट्टि देवुन सत्कार करण्यात आला.

यावेळी शंभुसेना युवा धुळे जिल्हाध्यक्ष तथा न्यु शिवरुद्राक्ष ग्रुपचे मुख्यप्रवक्ते जयदिप लौखे-मराठे, ग्रुपचे अध्यक्ष अक्षय पवार, सचिव जगदीश गवळी, सदस्य अजय वाघ, प्रशांत मराठे उपस्थित होते. या सत्कार समारंभाचे आयोजन न्यु शिवरुद्राक्ष ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते.