चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करणे प्रकार थांबवा .. आमदार बंटीभाऊ भांगडिया

23

🔹उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले पत्र

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.24जुलै):-कोरोना संकट काळ सुरू असताना पीक हंगाम व शैक्षणिक सत्र सुरू झालेले असून मात्र चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सपाटा वीज विभागाने सुरू केल्याने ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहे तेव्हा वीज विभागाने ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित न करण्याची मागणी करीत वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकारास स्थगिती देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रातून केलेली आहे

राज्यात सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा चंद्रपूर जिल्हा असतांना जिल्हा वासीयांना वीज निर्मितीच्या प्रदूषण चा त्रास सहन करावा लागत असताना विद्युत विभागाने विद्युत बिल भरणाऱ्याना अडचणी असणाऱ्या चे वीज खंडित करण्याचा सपाटा सुरू केलेला आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा क्षेत्र ग्रामीण भागात अंतर्गत येत असून मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायवर अवलंबून आहे. औधोगिक कारखान्यांचा अभाव असल्याने रहिवासी व शेती उत्पन्नाशिवाय पर्याय नसल्याने अल्प उत्पन्नात भाग येत असतो.ग्रामीण भागात उत्पन्नाच्या साधनाअभावी नैसर्गिक शेती करताना शेतीपंपाद्वारे पाण्याचे सिंचन करून थोडे अधिक उत्पन्न वाढवीत असतात परंतु अध्यापही शेतकरी निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमीच आहे.अश्या प्रकारे एका जनित्र वर चार पाच शेतकरी असल्याने काही शेतकरी वीज बिल भरण्यासाठी असमर्थ ठरत असल्याने वीज खंडित होण्याच्या तक्रारी वाढत आहे.

चंद्रपूर जिल्हा हा वनव्याप्त व हिंसक जनावरांच्या छायेत असल्याने रात्रीला ग्राम पंचायत चे विद्युत खांबा वरील वीज पुरवठा बंद झाल्यास बरेच हिंसक जनावरांचे स्थानिक नागरिकांवर हिंसक हल्ले वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्य शासनाने कोरोना काळात अत्यल्प उत्पन्न मुळे वीज बिल न भरणाऱ्याच्या घरगुती वीज खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे चंद्रपूर जिल्हा प्रदूषण ची हाल अपेष्टा सहन करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील वीज खंडित करण्याच्या मोहिमेस स्थगिती देण्याची मागणी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रातून केली असून ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत व मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांना सुद्धा पत्र दिलेले आहे.