जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते यांच्या क्षेत्रातील टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये निकृष्ट दर्जाचे कामे- शिवसेना महिला संघटीका तालुका जिवती सिंधुताई जाधव

26

🔸ग्रामपंचायत टेकामांडवा येथिल पांदन रस्ता गेला चोरीला

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.25जुलै):- अतिदुर्गम व अशिक्षित समजणारा जिवती तालुक्यातील टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत गावापासून ते श्री.भिंगेवाड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे बांधकाम दि.२५/०६/२०२१ ला पूर्ण झाले मात्र एकच महिनात पांदन रस्ता चोरीला गेला. ग्रामपंचायत टेकामांडवा येथे रस्त्याचे काम विविध योजनेतून होत आहे रस्त्यामुळे गावाच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होते. पण सरपंच उपसरपंच ठेकेदार इंजिनीयर व बि.डि.ओ यांच्या मनमानी कारभार सुरू आहे यामुळे गाव विकासाला चालना मिळत नाही आहे असे चित्र ग्रामपंचायत टेकामांडवा येथे दिसून येत आहे.

शासनाचा पैसा हा सर्वसामान्य माणसाच्या घामातुन उभा होतो, यातून होणारी विकासकामे दर्जेदारच असली पाहिजे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत टेकामांडवा ग्रामपंचायत मध्ये गावापासून ते श्री.भिंगेवाड यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाच झालं आहे. विकासकमाला विरोध नाही. मात्र निकृष्टदर्जाची कामे का म्हणून खपवून घ्यायची. गावविकासासाठी आम्ही सोबत आहोत मात्र शासनाच्या पैशाचा योग्य उपयोग होतं नसेल तर व अशा कामाची चौकशी अधिकारी करीत नसेल तर वेळप्रसंगी आंदोलन करु मात्र ग्राम पंचायत टेकामांडवा येथील निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. असा खणखणीत इशारा शिवसेना महिला संघटीका तालुका जिवती सिंधुताई जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे..

विकासकामामुळे गावांच्या विकासालाही सजग दृष्टी प्राप्त होतो पण ग्रामसेवक,सरपंच, उपसरपंच, ठोकेदार,व इंजिनियर, व बि.डि.ओ यांच्या मनमानी कारभार सुरू आहे. तसेच ग्रामसेवक सरपंच, उपसरपंच इंजिनियर, व बि.डि.ओ हे यांच्या मनमानी कारभार मुळे गावातील कामे निकृष्ट दर्जाचे कामे होत आहे, यामुळे गाव विकासालाही खिळ बसली आहे, असे चित्र ग्रामपंचायत टेकामांडवा येथे दिसत आहे. टेकामांडवा ग्रामपंचायत कडे प्रशासकीय अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असे आरोप सुध्दा शिवसेना महिला संघटीका तालुका जिवती सिंधुताई जाधव यांनी केले आहे..!