पाटोदा येथे झालेल्या ढगफुटी मूळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीसाठी वंचित आघाडीचे रस्ता रोको आंदोलन

27

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई,तालुका प्रतिनिधी)मो:-9763463407

अंबाजोगाई(दि.25जुलै):-आज दी. २४रोजी तालुक्यातील पाटोदा (म) येथे आयोजित रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे अंबाजोगाई व परिसरातील असंख्य नागरिक,शेतकरी, शेतमजूर वंचित कार्यकर्ते यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. पाटोदा येथे झालेली ढगफुटी यामुळे अनेकांचे प्रचंडच प्रमाणात आर्थिक व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी.

५%मुस्लिम समाज आरक्षण अंमलबजावणी करावी, तहसील कार्यालयात रेशन पुस्तीका असावी, लाभार्थी यांची हेळसांड थांबवा, अशा विविध मागण्या साठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली व कांहीं वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली. व आंदोलन शांततेत पार पडले. आंदोलनात यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाई तालुका अध्यक्ष संजय तेलंग, रत्नदीप सरवदे, सल्लागार, धर्मराज सरवदे, अजय सरवदे, जोगदंड, बाबु पठाण, उस्मान शेख, सलीम शेख, महेश देशमुख, पडोळे अंकुश, रमेश स्वामी, व गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित यांनी पाठिंबा दिला.