अविनाश साबळे यांना प्रोत्साहन देण्यासाठी व तालुक्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी सेंल्फीपाँईंट – आ.सुरेश धस

18

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.25जुलै):-जागतिक अँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अविनाशने ऐतिहासिक कामगिरी केली होती.त्याने तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात राष्ट्रीय विक्रम मोडला होता आणि जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.इतकच नाही तर जागतिक स्पर्धेच्या स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो पहिला भारतीय पुरुष ठरला होता.आता जपान येथे होत असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेतही तो भारताचे नाव उज्वल करणार असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.

      जपान येथे ऑलिंपिक स्पर्धा सुरू असुन विविध खेळातील १२६ भारतीय खेळाडूंचे प्रतिनिधित्व आपल्या मातीतला अविनाश हा करीत आहे.ही आपल्यासाठी कौतुक व अभिमानाची बाब तर आहेच पण अविनाश साबळे याला प्रोहत्सान देण्यासाठी व तालुक्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळावी या हेतूने जिल्हाक्रिडा अधिकारी व जिल्हा क्रिडा परिषद बीड यांच्यावतीने रविवार दि.२५ रोजी सकाळी नऊ वाजता आमदार सुरेश धस यांच्याहस्ते सेल्फीपाॅईंटचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी आष्टी नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील रेडेकर,रंगनाथ धोंडे,मनोज सुरवसे,सागर धोंडे,सय्यद तय्यब,क्रिडा संयोजक सय्यद वाहेद,संजय भोकरे,नितीन निमोणकर,विष्णू अदनाक,शेख अजिम,दिलीप सरोदे,सुनील वाळके,अंकुश निमोणकर,प्रा.गोरख मुळे,पै.फहाद चाऊस,राजाराम विधाते,प्रा.जमीर सय्यद,प्रा.मुश्ताक पानसरे,दाऊद शेख,अहमद पठाण,ज्ञानेश्वर मुरकुटे,गंगाराम बोराटे,आदी उपस्थित होते.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,आष्टी तालुक्यातील मांडवा या छोट्याशा खेडेगावात हिरा जन्माला आला आहे.

वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करतोय.१२ वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला.अविनाशने ३ हजार मीटर स्टीपलचेस मध्ये राष्ट्रीय विक्रमासह पदक मिळवले.त्याने ७ मिनिटे २० .सेकंदात नवा विक्रम नोंदवला.विशेष म्हणजे याआधीचा विक्रम २०१९ साली अविनाशच्या नावावर होता.तेव्हा त्याने २१.३७ सेकंदात हे अंतर पार केले होते.आता जपान येथे होत असलेल्या ऑलिंपिकमध्ये भारताचे नाव उज्वल करणार असल्याचा विश्वासही आ.सुरेश धस यांनी व्यक्त केला.