ऑनलाईन वर्षावास प्रवचन मालिकेस प्रारंभ-अध्यक्ष सातारा जिल्हा भारतीय बौद्ध महासभा

21

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.25जुलै):-वर्षावास प्रवचन मालिके निमित्त दि.२४ जुलै २०२१,आषाढ पौर्णिमापासून संपुर्ण जिल्ह्यासह अनेक तालुक्यात प्रवचन मालिका आयोजित करण्यात आली आहे. रविवार २रे पुष्प दि.२५/०७/२०२१ रोजी सायं.७:३०ते ८:३०या वेळेत होणार असून यावेळी वर्षावास प्रवर्चन मालिकेमध्ये प्रवचंनकार डॉ.मीनाताई इंजे,केंद्रिय शिक्षिका,जिल्हा महिला उपाध्यक्षा याचे प्रवर्चन होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष
आद.अविनाश बारसिंग सर,जिल्हा संस्कार उपाध्यक्ष असणार आहेत.

यावेळी मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आद.आर.व्ही.थोरवडे,आद. विध्याधर गायकवाड,जिल्हा सरचिटणीस,आड.श्रीमंत घोरपडे सर,जिल्हा कोषध्यक्ष यावेळी अध्यक्ष थोरवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सर्व धम्मबांधव,उपासक,उपासिका,केंद्रीय शिक्षक,शिक्षिका,आजी माजी श्रामनेर व माता-भगिनींना सदर प्रवचन मालिकेच्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व धम्म बांधव माता भगिनींनी सहकुटूंब सहभागी व्हावे अशी विनंती केली आहे.

सदर प्रवचन मालिका हि गूगल मीट च्या माध्यमातून ऑनलाईन होणार असून जिल्ह्यातील धम्म बांधवांनी https://meet.google.com/doi-fdeo-cvt Or open Meet and enter this code: doi-fdeo-cvt या लिंकद्वारे सदर प्रवचन मालिकेसाठी गुगल मीटच्या लिंकवर जॉइन व्हावे असे आवाहन करणेत आले आहे