इगतपुरी काॅगेसचे आमदार हिरामण जी खोसकर यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ नामकरण समिती वतीने निवेदन सादर

24

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.25जुलै):-कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ(ओझर) नामकरण समितीच्या शिष्टमंडळाद्वारे नाशिक इगतपुरी/त्रंबकेश्वर मतदारसंघाचे काॅगेसचे आमदार हिरामण जी खोसकर यांची त्यांच्या कार्यालयास समक्ष भेट घेऊन ओझर येथील विमानतळास कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव देणेबाबत राज्य सरकार कडे पाठपुरावा करावा अश्या मागणी चे निवेदन हिरामण जी खोसकर सादर करण्यात आले.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे ओझर एच.एल.येथील कारखाना उभारणीचे योगदान हे अत्यंत मोठे असल्याची जाणीव असल्याने आमदार हिरामण जी खोसकर सकारात्मक प्रतिसाद देऊन नामकरणाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.शिष्टमंडळ समितीचे मुख्य निमंत्रक सर्वश्री रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे ,समाजभुषण बाळासाहेब शिंदे,देवळाली कॅन्टोमेन्ट उपध्यक्ष विलास पवार, रिपाई नेते मदन शिंदे , आदेश पगारे,बाळासाहेब साळवे ,प्रशांत कटारे ,शिवाजी गायकवाड,पञकार शांताराम दूनबळे,प्रशांत शिंदे,आदी उपस्थित होते