शशितारा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने नगरसेवक श्रीकांत जगताप व पर्वती मतदार संघाच्या उपाध्यक्षा श्रावणी जगताप यांच्या तर्फे रक्तदान शिबीर व वृक्षारोपणाचे आयोजन

45

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.25जुलै):-भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक ३४ व शशितारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप शहर अध्यक्ष जगदीशजी मुळीक आमदार माधुरीताई मिसाळ,प्रदेश निमंत्रित सदस्य आदरणीय बाबा शेठ मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली व मतदारसंघाचे अध्यक्ष जितेंद्र पोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै 2021 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन पुण्यातील दामोदर नगर हिंगणे येथील श्रीकांत जगताप यांच्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते.

रक्तदान शिबिराचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शहराध्यक्षांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती , शाल , श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक श्रीकांत शशिकांत जगताप, भारतीय जनता पक्षाच्या पर्वतीमतदार संघाच्या उपाध्यक्षा श्रावणी जगताप, पुणे शहर सरचिटणीस नगरसेवक दिपक पोटे , सरचिटणीस नगरसेवक राजेश येनपुरे, पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष जितेंद्र पोळेकर , संघटन सरचिटणीस प्रशांत दिवेकर, खडकवासला मतदार संघाचे अध्यक्ष सचिन मोरे , प्रभाग अध्यक्ष नयन जोशी , प्रभाग युवामोर्चा अध्यक्ष रणजित करंजकर , प्रभाग महिला मोर्चा अध्यक्ष दिपाली मोने , विशाखा कुलकर्णी , मनीषा कापडे ,शेखर वाघ आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या शिबिराच्या आयोजनासाठी माजी सरपंच रत्नाकरतात्या जगताप, हभप पांडुरंगराव जगताप , मा ऍड राजेंद्र जगताप , संजय जगताप , सरस्वती जगताप , जानव्ही जगताप , जयनाथ जगताप , चेतन जगताप , हेमंत जगताप , रोहित जगताप , सागर जगताप यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. प्रत्येक रक्तदात्यास यावेळी वाफ घेण्याचे मशीन रक्तदान शिबिर आयोजकांतर्फे भेट देण्यात आले.या विविध उपक्रमांअंतर्गत रक्तदान शिबीर , वृक्षारोपण कार्यक्रम तसेच कोरोना काळात अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचा उपक्रम , स्वछता कर्मचाऱ्यांना शिधावाटप व सत्कार कार्यक्रम अश्या विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन आले होते

माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या आवाहनांप्रमाणे त्यांचा वाढदिवस समाजातील शोषित वंचित घटकांसाठी तसेच निसर्गासाठी कार्य करून साजरा केला.भाजप प्रभाग ३४ व शशितारा प्रतिष्ठाणच्या वतीने कोरोनाकाळातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या प्रसंगी पुणे शहरअध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्या कार्याचा गौरव करून कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले.