प्राचार्य डॉ.वसंत बिरादार यांचा पत्रकार संघाकडून सत्कार

48

✒️शुभम बेद्रे(लोहा प्रतिनिधी)

लोहा(दि.25जुलै):- येथील शासकीय विश्रामगृहावर प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचा गुरू पोर्णिमेनिमीत्त पत्रकार संघाकडून र्हदय सत्कार करण्यात आला.

मराठवाड्यातील जेष्ठ नामांकित साहित्यिक,कवी, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक वतनवाला चे सल्लागार, अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार यांचा एक शैक्षणिक व पत्रकारीतेचे गुरूवर्य म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा लोहा च्या वतीने तालुकाध्यक्ष शिवराज पवार यानी शाल पुष्पहार वेढा भरवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पवार, पत्रकार संजय कहाळेकर, मारोती चव्हाण, तुकाराम दाढेल,शिवराज दाढेल सह आदीं ची उपस्थिती होती.