सद्गुरुची सेवा हीच ईश्वर सेवा – ह.भ.प.शिंदे महाराज

    47

    ?सुदर्शन आश्रम शिंदेवाडी येथे गुरुपौर्णिमा कोरोनाचे नियम पाळून उत्सवात साजरी

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.26जुलै):-गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी व्यास यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.या दिवशी विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या गुरूंना शुभेच्छा देतात.अशाच प्रकारे नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शिंदेवाडी एक छोटेसे गाव आहे पण गाव जरी छोटे असले तरी त्या गावांमध्ये पंचक्रोशीतील लोकांच्या मनात असलेले श्रद्धास्थान आहे आणि ते म्हणजे सुदर्शन आश्रम शिंदेवाडी.गडाचे महंत ह.भ.प.गुरुवर्य श्रीधर महाराज शिंदे यांना गुरुपौर्णिमा निमित्त शुभेच्या देण्यासाठी खूप सारे पंचक्रोशीतील भक्तगण जमा झाले होते.यावेळी कोरोनाचे नियम पाळून बाबांनी सर्वांना मार्गदर्शन केले.गडावर गुरुपौर्णिमेनिमित्त ह.भ.प.गुरुवर्य श्रीधर महाराज शिंदे यांचे हरीकीर्तन झाले.यावेळी पंचक्रोशीतील भजनी मंडळी उपस्थित होते.

    तसेच जाटदेवळा,धामणगाव,खडकवाडी,
    सुरसवाडी,धनगरवाडी,नागतळा, इत्यादी ठिकाणच्या भक्तगणांनी बाबांना शुभेच्छा दिल्या.कीर्तनामध्ये गायनाचे काम ह.भ.प.अमोल महाराज गावडे,ह.भ.प.सुदाम महाराज पवार,ह.भ.प.ऋषी महाराज तांगडे,बाबासाहेब महाराज जरांडे,गणेश महाराज वालकर,संतोष महाराज गिरी यांनी केले.संतोष सकुंडे सुरसवाडी यांनी भोजन व्यवस्था केली.विनेकरी बाजीराव गांगर्डे व आश्रमातील विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.रोहित महाराज शिंदे हनुमंत महाराज गांगर्डे,नारायण महाराज पोकळे,संभाजी झिंजुर्के आदी भावीक मंडळी उपस्थित होती