शिक्षक गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2021 दिगंबर हनमंतराव मुदखेडे यांना तर सुभाष भीमराव सज्जन यांना आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

36

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो.9307896949

नायगाव(दि.26जुलै):-शिक्षकांची उंची प्रबल असते व त्यांचे ज्ञान दान श्रेष्ठ असल्याने त्यांना शासनासह विविध संस्थेमार्फत दरवर्षी विविध पुरस्कार वितरण करण्यात येते त्या अनुषंगाने शब्दगंध शब्दसमूह प्रकाशन औरंगाबाद व आम्रपाली प्रकाशन आंबेजोगाई यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

त्यामध्ये दिगंबर हनुमंत प मुदखेडे यांना शिक्षक गौरव आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2021 प्राध्यापक डॉ. रमेश जाधव सर सदस्य मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद यांच्या हस्ते व डॉ. श्री ज्ञानेश्वर माशाळकर सर सदस्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व शाल श्रीफळ देऊन दिगंबर हनमंतराव मुदखेडे सुजलेगावकर यांचा गौरव करण्यात आहे.

त्याचबरोबर विविध क्षेत्रातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध क्षेत्रांमधील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला त्यामध्ये मौजे सुजलेगाव येथील सुभाष भिमराव सज्जन यांना आंतरराष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्कार प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.