माजलगाव पंचायत समिती उपसभापती डॉ वसीम मनसबदार यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी- लोकजनशक्ती पार्टी

22

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

माजलगाव(दि.२६जुलै):- माजलगाव तालुक्यातील मौ.पात्रुड येथील 33 केव्ही उपकेंद्रातील वरिष्ठ तंत्रज्ञ विश्वास अशोक रोडे यांना जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण झाल्याप्रकरणी आज दिनांक 26/7/2021 रोजी लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने उपजिल्हाधिकारी श्री झाडके साहेब यांना निवेदन देण्यात आले संदर्भ असा की विश्वास अशोक रोडे हे माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथे कार्य कर्तव्यावर असताना ढोरगाव येथे खंडित झालेला.

विद्युत पुरवठा तत्काळ चालू करण्यासाठी माजलगाव पंचायत समितीचे उपसभापती डॉक्टर वसीम मनसबदार व त्यांच्या पाच साथीदारांनी मिळून ते कर्तव्यावर असताना शिंदेवाडी तहत वसंतनगर तांड्या वर जाऊन जबर मारहाण केली व त्यांना इनोवा गाडीत बसउन डॉक्टर मनसबदारांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन बाथरूम मध्ये कोंडून त्यांना लाट्या व पीव्हीसी पाईप ने मारहाण केली.

व जातीवाचक शिवीगाळ केली व नंतर जखमी अवस्थेत त्यांना रस्त्यावर आणून सोडले सदरील बाब गंभीर असून डॉ वसीम मनसबदार व त्यांच्या पाच साथीदारांनी विरुद्ध शासकीय कामात अडथळा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी या आशयाचे निवेदन लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने देताना राजेश भाऊ वाहुळे अशोक काळे आदित्य चौरे आजार सय्यद व इतर.