रोटरी क्लब चिमूरचा पदग्रहण समारंभ सम्पन्न

20

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.27जुलै):-रोटरी क्लब चिमूरचा पदग्रहण समारंभ हॉटेल सफारी येथे कोरोना नियमाचे पालन करीत सम्पन्न झाला, पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थनी माजी जिल्हा प्रान्तपाल महेश मोखाळकर तर जिल्हा सहायक प्रान्तपाल मुरली लाहोटी, माजी जिल्ह्या सहाय्यक प्रान्तपाल श्रीनिवास लेले, रोटरी क्लब मार्गदर्शक पराग पत्तिवार, उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाल, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल भगत, रोटरी क्लब वरोराचे अमित नाहर व वीजय पावड़े प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होते.

या वेळी रोटरी क्लब चिमूरच्या पदग्रहण कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश मोखाळकर यानी समाजाला आपल्याकडून काय फायदा झाला ते महत्वाचे असून समाजासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सर्वाणि मिळून एकत्रित राबवावे असे आव्हान केले, येत्या वर्षभरात विविध समाजोपयोगी उपक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्याने राबविन्यात येणार असल्याचे सांगितले, रोटरी क्लब चिमूरच्या अध्यक्षपदी डॉ, महेश खानेकर यांची नियुक्ति करण्यात आली, सचिव पदी वैभव लांडगे, सहसचिव पदी श्रेयश लाखे, कोषाध्यक्षपदी विनोद भोयर यांची 2021 व 2022 करीता निवड़ करण्यात आली.

2022 व 23 करीता प्रेसिडेंट इलेक्ट पदी रूपेश डोंगरवार यांची निवड करण्यात आली, कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र संगमवार व पवन ताकसांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद भोयर यांनी केले,रोटरी क्लब चिमूर पदग्रहण कार्यक्रमाकरीता प्रफुल बेत्तावार, विशाल गम्पावर, कैलाश धनोरे, महेश हिंगणकर, सुभास केमये, आदित्य पिसे, विलास अल्ड्वार, दिनेश कठाने, बंटी वनकर, राकेश बघेल, पवन मुळे व अन्य सदस्य उपस्थित होते