महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तालुका अध्यक्षपदी शेख फारुख

22

✒️अशोक हाके(बिलोली ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.27जुलै):-ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव बडूरकर, अशोक वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बिलोली येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती बिलोलीची कार्यकारिणी जाहीर झाली. त्यामध्ये अध्यक्षपदी शेख फारुख अहेमद, उपाध्यक्षपदी लक्ष्मणराव लंके व सायलू कारमोड, कार्याध्यक्षपदी अर्चन जमदडे, प्रधानसचिवपदी बडूर येथील सरपंच चेतना जाधव, बुवाबाजी संघर्ष विभाग गौतम भालेराव,वार्तापत्र व प्रकाशन विभागाच्या प्रमुखपदी बालाजी एल्गंद्रे, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प प्रमुखपदी बालाजी येलगंद्रे, विविध उपक्रम विभाग प्रमुखपदी मोहन जाधव, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभाग सुरेश कुर्डीकर सहशिक्षक, महिला विभाग पंचफुलाताई वडे, जात निर्मूलन व विवेकी जोडीदाराची निवड विभाग पांडुरंग मामिडवार , युवा व एक वाहिनी विभाग डॉ. संतोष वाघमारे, सोशल मीडिया विभाग राहुल भालेराव, प्रशिक्षण विभाग शंकर गायकवाड सहशिक्षक, कायदा विभाग अँडवोकेट आकाश लगूळकर, सांस्कृतिक विभाग बसवांना बरबडे सहशिक्षक, सहकारी सल्लागार शेषराव जेठे,यांची सर्वानुमते निवड झाली.कार्यकारिणीच्या प्रमुख सल्लागारपदी भीमराव बडूरकर, अशोक वाघमारे, गंगाधर आरसे, याची निवड झाली आहे.

सदरील निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी निरीक्षक म्हणून अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी पिठलेवाड व जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदडे उपस्थित होते. यावेळी शे.नि.विस्तार अधिकारी लक्ष्मणराव लंके आदीसह अनेक अंधश्रद्धा निर्मुलन समिती सदस्य यांची उपस्थिती होती.