आपत्ती आणि मुकी जनावरे

27

अवेळी अवकाळी पाऊस. भुकंप. चक्रीवादळ. पूर. ढगफुटी. ज्वालामुखी. अतिवृष्टी. ओला दुष्काळ. कोरडा दुष्काळ. अशा विविध माध्यमातून व बिकट परिस्थिती निर्माण होते त्याला आपत्ती असे म्हणले जाते. बघता बघता उन्हाळा संपला आणि पावसाची चाहूल लागली. लोकांची लगबग सुरू झाली आपली घरे दुरुस्ती करण्यासाठी. हवामान अंदाजानुसार यंदा पाऊस जास्त आहे घरातील अन्न धान्य जनावरांसाठी चारा. जर पाऊस काळ जास्त झाला तर पाऊसाळयात आपणांस व आपल्या कुटुंबांचे जनावरांचे कोणत्याही परिस्थितीत हाल होऊ नये यासाठी आपण नियोजन लावतो.

आणि एक वेळ मा जिल्हाधिकारी साहेब यांचा आपत्ती व्यवस्थापन २००५ व आपत्ती व्यवस्थापन कलम १५ नुसार सर्वांना कळविण्यात येते की पाणलोट क्षेत्रात पडत असणारा मुसळधार पाऊस यामुळे नदी काठी राहत असल्याले लोकांना स्थलांतरित होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. यांच्याकडून चेतावणी देण्यात येते. या निर्माण होणा-या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन. आरोग्य विभाग. विद्युत पुरवठा. दुरध्वनी. सार्वजनिक बांधकाम विभाग. परिवहन महामंडळ. पाटबंधारे विभाग. ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. पंचायत समिती. जिल्हा परिषद. व जिल्ह्यातील. मदतकार्य करणारे. संस्था. सेवाभावी संस्था. आर्थिक. सामाजिक. प्रशिक्षण. जनजागृती. यंत्रणा सराव. प्रतिस्पर्धी दल. यांना महापूराचया काळात मदतीसाठी तयार राहण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. व सर्वसामान्य जनतेला प्रशासनाला मदत करण्याचे आव्हान केले जाते.

१९९०/१९९९ हा काळ नैसर्गिक आपत्तीवर आवर घालण्याचे दशक म्हणून ओळखले जाते आणि हवामान अंदाजानुसार पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढतो आणि धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येतो आपणांस बातमी. मोबाईल द्वारे. मॅसेज कळतो. पाणी ईथ आल तिथ आल. धरणातील विसर्ग सुरू केल्यामुळे गावात. कानाकोपऱ्यात तालुक्यातील काही ठिकाणी जिल्ह्यातील काही ठिकाणी पाण्याचा फुगवटा वाढण्यास सुरुवात झाली. शासनाने वेळोवेळी लोकांना ताकीद देऊन सुध्दा लोकांना आपली जागा सोडून जाण्यास तयार नाहीत पाणी घरापर्यंत पोहचले बघता बघता पूरचे पाणी घरात घुसले पाणी घुसले मुळे लोकांची धास्ती वाढली. पाणी वाढतच होते.

शासनाने आपणांस वचन दिले प्रमाणे सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी शासन व अधिकार व कर्मचारी सेवाभावी संस्था सामाजिक संघटना आपली जात धर्म सोडून महापूरात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सज्ज झाले. पण आपली लोक आडगी आहेत पाणी तोंडात जाण्याच्या स्तराला आल्यावर पाळायला चालू करतात यांत्रिक बोटी. व हेलिकॉप्टर दल व अन्य मार्गाने मदत कार्य सुरू केले जाते आणि लोकांना सुखरूप ठिकाणी पोहचवल जात माणस पूरातून वाचविण्यासाठी शासन बरेच प्रयत्न करते. बोलणारयाचया. “एरंडया विकतात आणि न बोलणारा उपाशी मरतो ” आशी आपल्या मराठी भाषेत म्हनं आहे.

महापूर किंवा कोणतीही आपत्ती मग ती मानवनिर्मित असो अथवा नैसर्गिक असो. यात जीव जातो तो म्हणजे मुक्या जनावरांचा. आपण २००५ विसरलो नाही. २०१४ विसरलो नाही २०१९ तर आपण अजिबात विसरणार नाही कारणं महाप्रलय काय असतो ते आपण पाहिले आहे. भारतात दरवर्षी ५०/टक्के. भागात भुकंप. आणि ३०/टक्के भागात दुष्काळ पूर येतो. महापूर सारख्या संकटात प्रत्त्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी पळतो आणि निवारयाला जातो. आणि ज्यांना काही बोलता येत नाही. अशी खुंठयाला डांबून घातलेली जनावरें. सोडून नेण्याचं राहून राहून जाते. काहीजण राहण्यास गावांत असतांत आणि वस्ती रानात असते आणि रात्रीच्या वेळी पूराचे पाणी गोठ्यात घुसल्यावर. काय परस्थिती असेल विचार करण्याच्या पलिकडे आहे बांधल्यामुळे कुठ जाता सुध्दा येत नाही ती जनावरें टाचा खुडून मरताना त्यांचा जीव जाताना काय हाल होत असेल देव कोणालाही असे मरण देऊ नये. या मुक्या जनावरांत मांजर. कुत्री. गाय म्हैस वासरे. शेळ्या मेंढ्या लहान मोठी जनावरे. याची खरोखरच बिकट परिस्थिती होते.

२०१९ मध्ये आलेला महापूर आपण बघितला आहे त्यात. मोठ्या प्रमाणात जनावरं मृत्यू मुखी पडली. रस्त्याच्या कडेला मेलेली जनावरे फुगून पडली होती. प्रत्येकाला आपला जीव वाचवण्याचे पडलें होते. त्यामुळे या मेलेल्या जनावराकडे कोणाचेही लक्ष्य नव्हतं. त्यांची दुर्गंधी सुटल्यावर शासनाने पुढाकार घेऊन त्या मृत्यू जनावरांची योग्य ती विल्हेवाट लावली.
आपत्ती ग्रस्त लोकांसाठी जागोजागी जेवण राहण्याची सोय अडकलेल्या लोकांना भोजन पॅकेट पोहोचविले जाते. दवाखाना. तपासणी औषध त्यांची आपले सगेसोयरे करणारं नाहीत एवढी सेवा या आपत्ती ग्रस्त लोकांची उठाठेव केली जाते. शासनाने. या सर्व लोकांच्या पेक्षा आपत्ती काळात सर्वात अगोदर जनावर पूरातून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यांना चांगली जागा. स्वच्छ पाणी. चारा. आजारी जनावरांसाठी दवाखाना. जे काय करता येतील तेवढ्या सेवा सुविधा जनावरांसाठी करणे गरजेचे आहे. ज्या जनावरांनी लोकांच्या पडत्या काळात आपल्या दुधातून आर्थिक गरज भागविली.

त्यांना त्यांची किंमत आहे का नाही माहित नाही. बॅंक. सोसायटीच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांत परिषद योजनेतून घेतलेली जनावरें. त्यातील एखादे जनावरा मृत्यू मुखी पडलें तर बसलं की घर त्या गरिबांचे. शासनाने जनावरांना सुध्दा आपत्ती काळात नुकसान भरपाई साठी पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे मनुष्य मृत्यूमुखी पडले तर शासन पाच लाख मदत जाहीर करते. पूरकाळात. भूखसंकलन. सर्वांनी माणसांपेक्षा जनावरांना भरभरून मदत करा.

✒️लेखक- मा.अहमद नबीलाल मुंडे(माहिती अधिकार कार्यकर्ते सांगली)