पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी साठी तब्बल १६००कोटींची संरक्षण भिंत उभारणार

    33

    ?महाविकास आघाडी सरकारच्या येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

    ✒️मुंबई,विशेष प्रतिनिधी(अतुल उनवणे)

    मुंबई(दि.27जुलै):-कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे अनेक मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. तसेच अनेक भागात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे असंख्य कुटुंबांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकार आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात काही निर्णय घेत आहे.

    समुद्रकिनारी असणाऱ्या गावांच्या सुरक्षेसाठी संरक्षण भिंत बांधण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे.समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरून घटना घडू नये किंवा शेत जमिनी समुद्राच्या पाण्याने खराब होऊ नये यासाठी संरक्षण भिंत बांधणार आहे.पाच जिल्ह्याच्या अनेक भागात जवळपास 171 किलोमीटर संरक्षण भिंत बांधावी लागणार आहे. यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

    येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी ,रायगड, ठाणे आणि पालघर या 5 जिल्ह्यात ही संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे.कोकणातील दुर्घटना आणि नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी निर्णयामधील राज्य सरकारचा हा एक प्रयत्न आहे.केरळ सरकारने अशाच पद्धतीने निर्णय घेऊन संरक्षण भिंत बांधली आहे. त्याच धरतीवर राज्य सरकार हा निर्णय घेत आहे. अशी माहिती पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क ला मिळाली आहे.