झाडिपट्टितिल कलावंत यशवंत भानारकर तमाशाच्या माध्यमातुन देत आहेत समाज प्रबोधनाचे धडे

34

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.27जुलै):- महाराष्टाची संस्कृति हि विविध लोककलांनी नटलेली आहे .त्यातचआपली झाडिपट्टि तर विविध कलांनि सम्रुद्ध असुन ऐकशे एक धुरंधर कलाकार अस्तित्वात आहेत. पुर्विच्या काळात राजा महाराजे यांचे गुण गाण गाण्यासाठि शाहिर पोवाडे गायचे व त्यांचा उत्साह वाढवायचे आणि यातुन तमाशा व शाहिरांचि निर्मिति झाली.त्यातिलच एक प्रकार म्हणजे खडि गंमत,खडि गंमत या लोक कलेत शाहिर व सात ते आठ लोकांचा समावेश असतो.त्यातिल स्त्रि पात्र,पुरुष स्त्रिच्या वेषात साकारत असतो.आजच्या इंटरनेटच्या काळात हि खडि गंमत लोप पावत असलि तरि केवळ एक छंद म्हणुन काहि कलाकार आजहि हि कला जोपासत आहेत.

त्यातिलच एक कलाकार ब्रम्हपुरी जवळिल दिघोरि येथिल रहवासी असलेले यशवंत भानारकर आहेत विदर्भातिल प्रसिद्ध शाहिर वातुजि डेंगे यांच्या संचात डान्सर म्हणुन अनेक वर्ष काम केले त्यानंतर गावागावात होणार्या मंडई च्या कार्यक्रमातुन अनेक समाजप्रबोधनात्मक विषयावर कार्यक्रम सादर केलित आजहि ते हि कला जोपासत असुन दिवसेनदिवस हि लोककला लोप होण्याच्या मार्गावर आहे .गेल्या दोन वर्षापासुन तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावागावातिल मंडई चे कार्यक्रम बंद आहेत.अशा परिस्थितित उतरत्या वयात कुट्ंबाचे उदरनिर्वाह करणे कठिन झालेले असुन शासनाने कलावंताना मिळणारे मानधनाचा लाभ द्यावा असे मत यशवंत भानारकर यांनि व्यक्त केलेले आहे.