न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरच्या विद्यार्थ्यांचे सुयश

24

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.27जुलै):-सन २०२०- २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केलेले आहे.यामध्ये कु.मानसी रवींद्र हजारे, कु.मानसी खटूजी नेवारे व नसीब उमेद तागडे या विद्यार्थ्यांचा समावेश अाहे.सदर विद्यार्थ्यांचे शाळेच्यावतीने मुख्याध्यापक किशोर खोबरागडे,पर्यवेक्षक मुस्तकीम पठाण व शाळेच्या सर्व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केलेले आहे.

विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे विद्यार्थी व शिक्षकवृंद,पालक व त्यांच्या वर्गमिञांनी अभिनंदन केलेले आहे.आपल्या यशाचे श्रेय आईवडील व शाळेच्या शिक्षकांना या विद्यार्थ्यांनी दिलेले आहे.