उत्कृष्ट कार्यामुळे आष्टी,जि.बीड च्या “धनश्री” पतसंस्थेला सलग पाचव्यांदा “दिपस्तंभ पुरस्कार” प्रदान

    35

    ✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    आष्टी(दि.27जुलै):-महाराष्ट्र राज्य पतसंस्था महासंघातर्फे दिला जाणार मानाचा ‘दिपस्तंभ पुरस्कार’ २०२१ सलग पाचव्या वर्षीही पटकवून “धनश्री” पतसंस्थेने आपल्या कार्याचा परिचय पुन्हा एकदा दिला आहे.आर्थिक वाढ,थकबाकी वसुली,गुंतवणूक,सामाजिक कार्य,तंत्रज्ञानाचा वापर आदी बाबींचा विचार करुन हा पुरस्कार दिला जातो.”धनश्री” नागरी सहकारी पतसंस्थेचे आष्टीत घोडदौड सुरु आहे.  रंगनाथ धोंडे हे या पतसंस्थेचे अध्यक्ष असून अतिशय पारदर्शक आणि आर्थिक शिस्तीवर त्यांचे डोळ्यात तेल घालून लक्ष असते.परिणामी गेल्या चारवर्षापासून या पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य पतसंस्थेचा दिपस्तंभ हा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

    औंरगाबाद विभागत शेकडो पतसंस्था आहेत.यासर्वांच्या बरोबरीने व्यावसाय करणार्‍या “धनश्री” सलग पाचव्या वर्षी सन २०२१ चा प्रथम क्रमांकाचा दिपस्तंभ पुरस्कार जाहिर झाला आहे.हा पुरस्कार दि.२५ जुलै रोजी शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीरात फेडरेशनचे महाराष्ट्र अध्यक्ष काकासाहेब कोयटे,नगर जिल्ह्याचे उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांच्या प्रमूख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे सचिव जितेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
    ———————————————-
    “धनश्री” पतसंस्था गेल्या पाच वर्षापासून दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित होत आहे.आम्ही मराठवाड्यात जे चांगले काम करून सन्मान मिळविला आहे.यास आमचे ठेवीदार,कर्जदार व व्हा.चेअरमन सर्व संचालक यांच्यासह कर्मचा-यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी सांगितले.