महाराष्ट्र राज्याचे आदर्श मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा – राजेंद्र लाड

23

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.27जुलै):- जि.बीड येथे दि.२७ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे आदर्श मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे आष्टी तालुकाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली आहे.या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना तालुका शाखा आष्टी च्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे बीड चे प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष दिलीप डावकर व माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत रसाळ यांच्या मार्गर्शनाखाली श्रीक्षेत्र महादेव मंदिर आष्टी,जि.बीड(पिंपळेश्वर मंदिर आष्टी)येथे मा.मुख्यमंत्री साहेबांना दिर्घायुष्य लाभावे व महाराष्ट्र राज्यावरील कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे यासाठी महाअभिषेक करण्यात आला.

तसेच प्रेरणा पंधरवाडा अंतर्गत शिक्षक सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भाऊसाहेब लटपटे(उपजिल्हाप्रमुख,बीड),जालींदर वांढरे(समन्वयक,आष्टी तालुका),सुभाष राऊत(जेष्ठ शिवसैनिक),महेश धोंडे(शहरप्रमुख आष्टी),महेश एकसिंगे(उपशहरप्रमुख आष्टी),रवि तांबे(युवा सेना,उपशहरप्रमुख आष्टी),माऊली मुसळे(शिवसैनिक,आष्टी)उपस्थित होते.तरी सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावावीत व ती जगवावीत असेही शेवटी राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.