साठ प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या देवदूताचा आमदार राजेश एकडे यांनी केला सत्कार

100

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.27जुलै):- जिल्हामधील नांदुरा -मानेगाव येथील पूर्णा नदीच्या पुलापूर्वीच एस.टि.चे ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेल्या एस.टि. बसला तात्काळ नियंत्रित करून बसमधील साठ प्रवाशांचे प्राण वाचविणारे जळगाव जामोद आगाराचे चालक श्री.गणेश वसंतराव बोदडे रा.नांदुरा खुर्द यांचा कार्याचा गौरव करून आमदार राजेश एकडे यांनी त्याचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या..

जळगाव जामोद आगाराचे चालक श्री.गणेश वसंतराव बोदडे रा.नांदुरा खुर्द हे बस क्रमांक एम.एच. ४० ए. क्यू.६३३८ ज्या बसमधून साठ प्रवासी घेऊन दि.२२ जुलैला जळगाव जामोद वरून नांदुराकडे येत असताना मानेगाव पार केल्यानंतर पूर्णा पुलाकडे वळत असताना अचानक बसचे ब्रेक फेल होऊन निकामी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पुला पूर्वीच बस नियंत्रित केली व सुरक्षित उभी केली त्यामुळे चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील साठ प्रवाशांचे प्राण वाचले व मोठा अपघात टळला.याबाबतची बातमी दैनिक लोकमतने प्रकाशित करुन चालकाच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली.या बाबतची माहिति मिळताच आमदार श्री . राजेश एकडे यांनी चालक श्री.गणेश वसंतराव बोदडे रा.नांदुरा यांचा कार्याचा गौरव करून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

“गणेशचे कार्य कौतुकास्पद” नांदुरा-ब्रेक फेल झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत बसचालक श्री.गणेश वसंतराव बोदडे यांनी गाडी नियंत्रित केली व त्यामुळे प्रवासी सुखरूप घरि पोहोचले ही कामगिरी कौतुकास्पद असून प्रत्येक कर्मचार्‍यांने आपल्या कार्याप्रती अशिच समर्पित भावना ठेवली पाहिजे,अशी समर्पक भूमीका सत्कारा दरम्यान व्यक्त केली.यावेळी नांदुरा नगर पालिकेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना शहरप्रमुख लालाभाऊ इंगळे,पत्रकार किशोर खैरे,सामाजिक कार्यकर्ते गोकुल खेडकर,अनंता भारंबे,शशिकांत पाटील,पत्रकार सुहास वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती….