चांदवड पोलीस स्टेशन येथे मोफत जलनेती प्रशिक्षण अभियान संपन्न

    44

    ✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

    नाशिक(दि.27जुलै):- चांदवड येथील योगदर्शन फाउंडेशन संचलित योग विद्या धाम, चांदवड आयोजित आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन दिल्ली व पारस मिरॅकल, नगर. यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्याने नाशिक जिल्ह्यात प्रथमच चांदवड तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत जलनेती प्रशिक्षण अभियान अंतर्गत पोलीस स्टेशन,चांदवड येथे हे अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

    कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक समीर बारवकर व योगदर्शन फाउंडेशनचे अध्यक्ष व योग विद्या धाम, चांदवडचे केंद्रप्रमुख राहुल (अंबादास) बी. येवला उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते मोफत जलनेती पात्रांचे वाटप करण्यात आले.
    योग प्रशिक्षक राहुल बी. येवला यांनी जलनेती ही नासिकामार्गाची शुद्धिक्रिया कोविड १९ या व इतर संसर्गजन्य आजारासाठी तसेच श्वसनाच्या विकारांवर कशी प्रभावी आहे याचे प्रात्यक्षिकासह महत्व विशद केले. त्यानंतर राहुल येवला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करत वेगवेगळ्या गटात जलनेतीचा प्रात्यक्षिक अभ्यास केला. शेवटी सर्व लाभार्थी कर्मचाऱ्यांनी जलनेती हि शुद्धिक्रिया आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त व फायदेशीर असल्याचे मनोगत व्यक्त केले.

    तसेच पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी आपल्या भाषणात जलनेती व योगाभ्यास हा कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, तरी चांदवड तालुक्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. व राहुल येवला यांनी हे शिबीर अजून काही दिवस चालणार असून इच्छुक नागरिकांनी ९३७०३८२९४२/७३८५२१६९५१ वर संपर्क साधावा असे सांगितले.शिबिराच्या आयोजनासाठी इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वामी शिवानंद महाराज व नाशिक जिल्ह्याच्या उपाध्यक्षा डॉ. तस्मिना शेख, आणि योग विद्या गुरुकुल नाशिक व अखिल भारतीय योगशिक्षक महासंघ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

    सदर कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरीक्षक विशाल सणस, गजानन राठोड, पोपट करवाळ, राजू गोसावी, सलीम शेख, वेणुनाथ पाटील कैलास जगताप नरेंद्र सौंदाणे, विजय जाधव, भाऊसाहेब अहिरे, ज्ञानेश्वर देवरे, दीपक मोरे, बापू चव्हाण, अशोक पवार, ललित चौरे, मन्साराम बागुल, अरुण डोंगरे,जगन्नाथ मोरे राजेंद्र बिन्नर,राजू गायकवाड,कविता साळवे, अर्चना जगताप, शिल्पा काळे, सविता राठोड, यमुना बर्डे, सविता फुलकर, आदी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल योग विद्या गुरुकुल, नाशिकचे अध्यक्ष व कुलगुरू डॉ. विश्वास मंडलिक, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंगेश त्रिवेदी, राज्याचे अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार,आदींनी आनंद व्यक्त केला.