परीक्षेपासून वंचित राहिलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्या अन्यथा तीव्र आंदोलन:-विक्रांत गांगुर्डे यांचा इशारा

21

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.27जुलै):-आज नुकतीच 27/7/2021मंगळवार रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र नाशिक विभागाचे समन्वयक डॉ.प्रशांत टोपे यांची भेट रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन वरील आशयाचे निवेदन सादर केले आहे

निवेदनात म्हटले आहे की अंतिम वर्ष कला,वाणिज्य, विज्ञान ह्या शाखेच्या अंतिम परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येत असून लॉकडाऊन व अतिवृष्टी मुळे व इतर अनेक कारणांमुळे हजारो विद्यार्थी ऑनलाइन परिक्षेपासून वंचित राहिले अनेक लोक काम धंदा नसल्याने गावी गेले आणि तिकडेच अडकून बसले याच काळात अतिवृष्टी झाल्याने वीजेच्या खंडित पुरवठ्यामुळे व नेटवर्क च्या प्रॉब्लेम मुळे विध्यार्थ्यांची तारांबळ उडाली ज्यांच्या परीक्षा राहिल्या त्यांच्या साठी विद्यापीठाने ४८ तासाच्या आत तक्रार करा असे म्हटले होते परंतु ज्यांच्या कडे स्वतःचा मोबाईल नाही असे विद्यार्थी सायबर कॅफे मध्ये जाऊन परीक्षा देतात तक्रार देखील ऑनलाइन करायची होती,परंतु अतिवृष्टीमुळे सायबर कॅफे देखील ३-४ दिवस बंद होते.

म्हणून अनेक विध्यार्थ्यांना तक्रार देखील करता आली नाही म्हणून ज्या तक्रारदार विद्यार्थ्यांची पुनपर्रीक्षा घेणार आहात त्याच कालावधीमध्ये जे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले अश्या विद्यार्थ्यांची देखील परीक्षा घेण्यात यावी मागण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत गांगुर्डे, प्रतीक चंद्रकांत आल्हाट,युवा नेते मानवाधिकार संघटनेचे नाशिक जिल्हाप्रमुख प्रसाद भालेराव,निखिल नाना मैंड, विद्यार्थी संघटनेचे भूषण गायकवाड, भूषण दांडगे,अजय हरिजन,विकीबाबा काळे,युवा नेते नितीनभाऊ गांगुर्डे, युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.