शहरातील परवानाधारक मद्यविक्रेत्यांकडून शासकीय नियमावलीला तिलांजली

32

🔸पोलीस बघ्याच्या भूमिकेत असल्याने “अर्थपूर्ण” व्यवहाराच्या शंकेला पेव….!

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.28जुलै):-एप्रिल 2015 ला चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या दारूबंदी च्या शासकीय निर्णयानंतर, जिल्ह्यात अवैध दारू च्या महापुराने अक्षरशः हुडदंब मांडला गेल्या होता, तर अबालवृद्धा पासून ते महिला सुद्धा अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात सक्रिय झाल्याने जिल्ह्यात पोलीस यंत्रनेचे काम दोन-चार पटीने वाढल्याचे गुन्हेगारी आकडेवारी वरून बघायला मिळाले, सक्रिय पोलीस यंत्रनेणे जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवरत मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद पो. स्टे. ला सुद्धा केली.

परंतु महाविकास आघाडी सरकार ने जिल्ह्यातील दारूबंदी उठवीण्याच्या घेतलेल्या निर्णयाने ह्या दारू तस्करांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भाग व जिल्ह्यालगत असलेला दारूबंदी जिल्हा गडचिरोली कडे वळवीला असून,यांना ब्रम्हपुरी शहरातील परवानाधारक देशी व विदेशी मद्य विक्रेत्यांचा सहकार्य लाभत असून, शासकीय नियमावली ला तिलांजली देत खुलेआम “पेटी” ने स्टॉक मध्ये माल देत.

त्याची वाहतूक शहरातून भरदिवसा बिनधास्त होतं आहे, तर लॉकडाऊन दरम्यान ईतर व्यवसायिकांना वेळेचं बंधन व कडक शिस्तबद्ध नियमावली असतांना शहरातील परवाना धारक मद्य विक्रेत्यांना कुठलेही बंधन नसल्यागत दारू विक्री चालू असल्याचे शहरात स्पष्ट दिसत आहे. स्थानिक पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलीस प्रशासनाच्या अकार्यक्षम भूमिकेवर नागरिकांतून प्रश्न उपस्थित केले जात असून “अर्थपूर्ण’ व्यवहाराने सेटलमेंट प्रणाली चा वापर होतं असल्याच्या शंकेला सर्व स्तरातून चर्चील्या जात आहे