कृष्णापूर ते लहान तांड्या पर्यन्त पांदण रस्ता पक्का करा- समस्त गावकऱ्यांची मागणी

29

🔹तहसील व पंचायत समितीत गावकऱ्यांनी दिले निवेदन

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.28जुलै):- तालुक्यातील मौजे कृष्णापूर येथील लहान तांड्या ते कृष्णापूर पर्यन्त पांदण कच्चा रस्ता पक्का आणि नाल्यावर पूल बांधून देण्याची मागणी कृष्णापूर गावातील समस्त गावकरी यांनी तहसीलदार व पंचायत समिती यांच्याकडे रितसर विनंती निवेदन देऊन केले आहे.कृष्णापूर व कृष्णापूर लहान तांडा यांना जोडणार मुख्य रस्ता म्हणजे पांदण रस्ता होय.लहान तांड्यातील लोकांना अनके कामाकरिता कृष्णापूर गावात ये-जा करण्यासाठी एकच रस्ता आहे ते म्हणजे पांदण रस्ता.तांड्यातील 150,200 लोकांना कृष्णापूर गावात शेतीसाठी, विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी, रुग्णाला रुग्णालयात येण्यासाठी अशा अनेक कामासाठी गावात यावेच लागते.

गावातुन पांदण रस्ताकडे जात असतांना एक नाला लागतो पावसाळ्यात त्या नाल्याला खूप पाणी असल्याने लहान तांड्याचा आणि कृष्णापूर गावाचा संपर्क तुटतो.
तांड्यातील गंभीर रुग्ण व गरोदर महिला यांना वैद्यकीय सुविधा मिळणे आवश्यक असते.पण पांदण रस्ता कच्चा व चिखलाने माखलेला व चिखलमय असल्याने ये – जा करण्यात अडथळा निर्माण होतो.चिखलमय कच्चा रस्ता व नाला पार करणे नागरिकांना जेवघेणे ठरू शकते.म्हणून आम्हाला पांदण कच्चा रस्ता पक्का व नाल्यावर पूल तयार करून देण्याची मागणी कृष्णापूर व तांड्यातील समस्त नागरिकांनी केली आहे.यावेळी पंचायत समिती उमरखेड बांधकाम सभापती राम देवसरकर याच्या समोर जण समुदायाने त्यांची व्यथा व्यक्त केली.व तहसील व पंचायत समिती समोर कृष्णापूर गावातील नागरिक उपस्थित होते.