प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी बालासाहेब कराड

21

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

अंबाजोगाई(दि.28जुलै):-येथील कै.वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आश्रम शाळेतील धडाडीचे अधिक्षक बालासाहेब कराड यांची आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.दरम्यान राज्याध्यक्ष संतोष राजगुरू यांच्या स्वाक्षरीने बीड जिल्ह्याची आश्रमशाळेच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवण्या संदर्भात ही नियुक्ती करण्यात आल्याने सबंध बीड जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,ऊसतोड कामगार आणि सर्वसामान्य शेतमजुरांची संख्या बीड जिल्ह्यात मोठी आहे.त्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून जिल्ह्यामध्ये आश्रम शाळांची संख्या आहे.या आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर तसेच अधीक्षक अशा विविध घटकांचे विविध प्रश्न आहेत.

शासन दरबारी हे प्रश्न सातत्याने मांडले गेले.परंतु म्हणावा असा त्याला प्रतिसाद मिळाला नाही.ही बाब लक्षात घेऊन प्रहार शिक्षक व शिक्षकेतर आश्रम शाळेच्या संघटनेच्या माध्यमातून राज्य स्तरावरील ही संघटना काम करीत आहे.प्रहार शिक्षक व शिक्षकेतर आश्रमशाळा संघटनेच्या माध्यमातून आश्रमशाळांतील कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्याची धमक असलेला कार्यकर्ता/अधिक्षक बालासाहेब कराड यांची नियुक्ती नुकतीच राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू यांनी केली आहे.

यामुळे आश्रमशाळांचे प्रश्‍न शासन दरबारी मांडून ते सुटतील,असा आशावाद जिल्हाभरातील आश्रमशाळांच्या शिक्षक-शिक्षकेतर आणि अधिक्षाकांमध्ये आहे.
दरम्यान,प्रहार आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई,परळी,पाटोदा,शिरूर, माजलगाव आदीसह विविध सर्व तालुक्यांमधून नूतन बीड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कराड यांचे अभिनंदन होत आहे.आश्रमशाळांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
——————
‘विश्वास सार्थकी ठरवणार
प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू आणि राज्य स्तरावरील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर बीड जिल्हा अध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी एक सैनिक म्हणून प्रामाणिकपणे पार पाडेल.किंबहुना आश्रमशाळांचे प्रश्न विनासायास त्यांच्या माध्यमातून शासन दरबारी मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.जिल्हाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली,हा विश्वास शिक्षकांच्या पाठबळावर नक्की सार्थकी लावू.
बालासाहेब कराड
(जिल्हाध्यक्ष,प्रहार शिक्षक व शिक्षकेतर आश्रम शाळा संघटना,बीड.)