दोंडाईच्यात शहिद जवान निलेश महाजन यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम…

22

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.29जुलै):-(श. प्र.) मणिपूर येथे गोळी लागून उपचारादरम्यान वीरमरण आलेल्या निलेश महाजन या वीर जवानाच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. दोंडाईचा शहरातील महादेवपुरा भागातील पाण्याच्या टाकी जवळ श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मणिपूर येथे गोळी लागून उपचारादरम्यान वीरमरण आलेल्या निलेश महाजन या वीर जवानाचा पार्थिवावर आज धसोनगीर येथे शोकाकुल वातावरणामध्ये तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोंडाईचा येथे महादेवपुरा पाणीच्या टाकी जवळ श्रध्दांजली पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहिद जवान निलेश महाजन यांच्या प्रतिमेला पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी माल्यार्पण केली तर नगरसेवक नरेश गिरासे यांनी फुले अर्पण केली. व सर्वांनी दोन मिनिटे शांत राहत शहीद विर जवान निलेश महाजन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोळी समाज अध्यक्ष मयूर कोळी, आप्पा कोळी यांनी मेहनत घेतली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, नगरसेवक नरेंद्र गिरासे, शिवसेना उप जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, माजी नगरसेवक रतिलाल नवसारे, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, वाहन चालक राजेंद्र सोनवणे, कोळी समाज अध्यक्ष मयूर कोळी, आप्पा कोळी, अविनाश ठाकूर, संदीप ठाकूर, बापू राजपूत, मुकेश कोळी, सरजू नाईक, गोलू चौधरी, विक्की सोनार, महादेवपुरा भागातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.