आण्णा भाऊ साठे नामकरण चौक व पृथ्वी स्तंभ याची मोडतोड करणाऱ्या जातीयवाद्यांना त्वरित अटक करा-धर्मराज लोखंडे

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.29जुलै):-जोगेशवरी,ता.गंगापूर,जी.औरंगाबाद येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नामकरण चौक व पृथ्वी स्तंभाची तोडफोड करणारे जोगेशवरी येथील ग्रामपंचायतीचे जातीयवादी उपसरपंच प्रवीण दुगिले व त्याचे समर्थक गुंड यांनी जेसीबीच्या सहाय्याने लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नामकरण चौक व पृथ्वी स्तंभ यांची जातीयवादी गुंडाकडून तोडफोड करणेत आली यावेळी जोगेशवरी गावातील मातंग समाजातील बांधवांनी गावचे उपसरपंच यांच्या कडे व त्याच्या साथीदाराकडे विचारणा केली असता स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने उपसरपंच प्रवीण दूगिले यांनी जमा झालेल्या मातंग समाजातील माता भगिनी यांच्यावर लाठी हल्ला करून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली.

यामुळे मातंग समाजातील माता भगिनीवर झालेल्या अमानुष लाठी चार्जमुळे सामान्य व गरीब लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशा या जबाबदार रक्षक जातीयवादी गुंडावरती व समाजामध्ये जातीय तेढ निर्मान करणाऱ्या नराधमांना त्वरित अटक करून त्याच्यावर कारवाई करणेत यावी व त्याच्यावर गुन्हे दाखल करणेत यावेत जर का या जातीयवादी नराधमाच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर महाराष्ट्रातील सकल मातंग समाज न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.महामानवाचा अवमान मातंग समाज कदापि खपवून घेणार नाही 1 ऑगस्ट रोजी महामानव आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती पर्यंत जोगेशवरी येथील आण्णा भाऊ साठे नामकरण चौक व पृथ्वी स्तंभ सन्मानाने उभा केला नाही तर महाराष्ट्रातील मातंग समाज गप्प बसणार नाही.

यादरम्यान काही विपरीत घडल्यास या सर्व बाबीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील या जातीयवादी प्रवृत्तीच्या उपसरपंच प्रवीण दूगिले व त्याच्या सहकार्याचा महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो असे धर्मराज लोखंडे यानी सांगितले यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाययक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांना निवेदन देन्यात आले.

यावेळी आरपीआय सातारा जिल्हा उपाध्यक्ष महेश लोखंडे,वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष शहाजी लोखंडे,दलित पँथर माण तालुका अध्यक्ष प्रमोद लोखंडे,मानवी हक्क अभियान सातारा जिल्हाध्यक्ष धर्मराज लोखंडे,भाजपा अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष सचिन लोखंडे,वंचित बहुजन आघाडी युवा तालुका उपाध्यक्ष संतोष लोखंडे,वंचित बहुजन आघाडी जिल्हा समनवयक संभाजी लोखंडे, व इतर मातंग समाजातील बांधव व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.